आधार कार्ड दाखवून नेपाळींची भारतीय हद्दीत घुसखोरी, सुरक्षेसाठी धोक्याची घंटा

| Updated on: Dec 10, 2020 | 4:09 PM

नेपाळमधून भारतात येताना काही नेपाळी नागरिकांनी आधार कार्ड दाखवल्याचे समोर आले असून ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. (India Nepal Border)

आधार कार्ड दाखवून नेपाळींची भारतीय हद्दीत घुसखोरी, सुरक्षेसाठी धोक्याची घंटा
Follow us on

नवी दिल्ली : भारत आणि नेपाळमध्ये मैत्रीचे संबंध असल्यामुळे दोन्ही देशात येण्या जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा लागत नाही. सीमेवर चौकशी साधारण केल्यानंतर दोन्ही देशात प्रवेश मिळतो. मात्र, आता नेपाळमधून येणारे नागरिक आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतात. नेपाळ सीमेला लागून असलेल्या टनकपूर जिल्ह्याचे एसडीएम हिमांशु कफाल्टिया यांनी याबाबत इशारा दिला आहे. (Citizens from Nepal showing Aadhar card for enter in India)

भारतात येणाऱ्या मार्गावर बनबसा येथे नेपाळच्या नागरिकांची मोठी रांग पाहायला मिळाली.हिमांशु कफाल्टिया यांनी बुधवारी नेपाळच्या बऱ्याच नागरिकांकडे भारताची आधारकार्ड पाहायला मिळाल्याचे सांगितले. ही बाब भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकते.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हिंमाशु कफाल्टियांनी सीमेवर चौकशी करताना आलेला अनुभव सांगितला. सीमेवर लोकांना त्यांची ओळखपत्र दाखवण्यास सांगितले जाते. नागरिकांनी ते ज्या कंपनीत काम करतात ते ओळखपत्र दाखवल्यास ते कामगार असल्याचं समजतं. मात्र, काही लोक आधार कार्ड दाखवत आहेत, ही भारतीय सुरक्षेसाठी धोक्याची बाब असल्याचे, त्यांनी सांगितले. (Citizens from Nepal showing Aadhar card for enter in India)

धारचुला आंतरराष्ट्रीय संस्पेशन ब्रीज 18 नोव्हेंबरला 9 तासांसाठी खुला करण्यात आला होता. नेपाळ सरकारच्या मागणीवरुन हा निर्णय घेण्यात आला होता. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार भारत-नेपाळमधील आंतरराष्ट्रीय संस्पेंशन ब्रीज आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि बुधवारी खुला केला जातो.

नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी

नेपाळमधील नागरिकांनी देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. नेपाळच्या नागरिकांनी राजकीय पक्षांविरोधात संताप व्यक्त करत पुन्हा एकदा राजेशाही आणावी, अशी मागणी केली आहे. नेपाळमध्ये 2008 पासून 2020 या 12 वर्षात 11 पंतप्रधानांनी कारभार पाहिला आहे. यामुळेही नागरिकांमध्ये असंतोष आहे.

2008 मध्ये राजेशाहीचा शेवट

नेपाळनं 2008 मध्ये 240 वर्ष जूनी राजेशाही पद्धत रद्द करुन लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली होती. 2015 मध्ये नेपाळमध्ये नवे संविधान बनवण्यात आले. त्यानंतर देशाला लोकशाही संघराज्य प्रजासत्ताक देश घोषित केले गेले. संविधानानुसार 2017 मध्ये नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये नेपाळमधील मार्क्सवादी पक्ष सत्तेत आला. प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये पृथ्वी नारायण शाह यांचे पोस्टर हाती घेतले होते. पृथ्वी नारायण शाह 18 व्या शतकातील आधुनिक नेपाळचे संस्थापक होते.

संबंधित बातम्या:

नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलक रस्त्यांवर, राजकीय पक्षांविरोधात संताप

नेपाळ-चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली ! उंची वाढली की कमी झाली?

(Citizens from Nepal showing Aadhar card for enter in India)