मोठी बातमी! पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात तब्बल इतकी वाढ, पाहा नवीन दर..
Petrol and diesel rates : इराण आणि अमेरिका युद्धात सतत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये चढउतार बघायला मिळाले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यातच भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. आता भारताच्या मोठ्या तेल कंपनीने थेट निर्णय घेतला.

जागतिक तणाव वाढला आहे. या तणावात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळतोय. जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये सतत चढउतार होत आहेत. त्यातच भारतातील इंधनाची विक्री करणारी सर्वात मोठी खाजगी कंपनी असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ मोठी वाढ केली. ज्याने एकच खळबळ उडाली. भारतात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध ज्यावेळी भडकले होते आणि दोन्ही बाजूंनी हल्ले होत होते. त्यावेळी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. पुन्हा आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले तेल व प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दर आणि किरकोळ विक्रीचे दर यांमधील तफावत कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे कळतंय.
इराण आणि अमेरिकेच्या युद्धात सुरूवातीच्या संघर्षात ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला होता. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढत असतानाही भारतीय तेल कंपन्यांनी तेवढी वाढ केली नव्हती. 26 मार्च रोजी पेट्रोलच्या किंमतीमध्ये पाच प्रति लीटर वाढ केली आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तीन रूपयांनी वाढ केली. त्यानंतर जागतिक बाजारात पुन्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले आणि कंपनीने केलेली वाढ त्यांनी मागे घेतली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि शुद्ध केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीत झालेली वाढ हा मुख्य घटक मानला जातो. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत इंधन विक्रेत्यांवरील खर्चाचा बोजा वाढला आहे. जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता कायम असताना आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत असताना नायराचा हा निर्णय आला आहे.
STORY | Nayara Energy hikes petrol price by Rs 5, diesel by Rs 3
Nayara Energy, India’s largest private fuel retailer, has raised petrol prices by Rs 5 per litre and diesel by Rs 3 with immediate effect, seeking to narrow the gap between retail prices and rising international… pic.twitter.com/0qOeidDT3Y
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या आंतरराष्ट्रीय खर्चात आणि देशांतर्गत विक्री दरांमध्ये असलेली तफावत कमी करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. त्यातच हा मोठा निर्णय घेण्यात आला. होर्मुज खाडीतही अजून तणाव आहे. होर्मुज खाडीत पुन्हा तणाव वाढला आहे. तेलाच्या जहाजांवर हल्ले केले जात आहेत.