Plane Crash : मोठी विमान दुर्घटना! लष्कराच्या 2 बड्या अधिकाऱ्यांसह सर्वांचा जळून कोळसा, एका क्षणात सगळं सपलं

काँगोमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लष्कराच्या 2 बड्या अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Plane Crash : मोठी विमान दुर्घटना! लष्कराच्या 2 बड्या अधिकाऱ्यांसह सर्वांचा जळून कोळसा, एका क्षणात सगळं सपलं
plane crash
Image Credit source: plane crash
| Updated on: Sep 26, 2026 | 8:26 AM

काँगोमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लष्कराच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. काँगोच्या लष्कराने शुक्रवारी अपघाताला दुजोरा दिला. लष्कराच्या माहितीनुसार, या विमान दुर्घटनेत जनरल मुटोंबो कातालायी टिएंडे आणि लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचा अपघाती मृत्यू झाला. टिएंड हे लष्करी न्यायालय विभागाचे प्रमुख होते. तर लिकुलिया हे सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल होते.

काँगो सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल एफोमी एकेंगे यांनी म्हटलं की, दोन्ही अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या दुर्घटनेत शिष्टमंडळाच्या 12 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. विमानातील सर्व कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. विमानातील कोणताही व्यक्तीचा जीव वाचला नाही’.स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमान हे किक्विट शहरातून राजधानी किंशासा येथे परतत होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. विमानाचा अपघात नेमकं कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास लष्कराच्या अधिकाराऱ्यांनी सुरू केला आहे. अद्याप विमान अपघाताचं कारण स्पष्ट झालेलं नाही. काँगो देश आधीच सुरक्षा संकटाचा सामना करू लागला आहे. एकाबाजूला देशाचे सशस्त्र आणि बंडखोर गटांशी लढत आहेत. देशच्या पूर्व भागात आव्हानात्मक स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंडखोरांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. त्यांनी पूर्व काँगोमधील अनेक प्रमुख शहरे ताब्यात घेतली आहे. बंडखोरांकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एका क्षणात सगळं संपलं! 

तत्पूर्वी, डोंगराळ भागात विमान कोसळलं. त्यानंतर आगीचा एकच भडका उडाला. एका क्षणात सर्व विमान आगीच्या विळख्यात अडकले. विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की, एका क्षणा सर्वांचा जळून कोळसा झाला. विमानाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर काही स्थानिक मदतीला धावले. परंतु क्षणात संपूर्ण विमान जळून खाक झाले होते. काही लोकांनी या घटनेचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us