AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया करणार युरोपियन देशांवर हायब्रिड हल्ला, CIA चा इशारा, युद्धाची व्याप्ती वाढणार

एकीकडे गेली चार वर्षे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरु असताना हे युद्ध आता युरोपीयन देशांच्या सीमेवर येऊन पोहचले आहे.त्यातच आता अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने दिलेल्या इशाऱ्याने खळबळ उडाली आहे.

रशिया करणार युरोपियन देशांवर हायब्रिड हल्ला, CIA चा इशारा, युद्धाची व्याप्ती वाढणार
drone attack
| Updated on: Sep 25, 2026 | 4:09 PM
Share

अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने अनेक युरोपीयन देशांना इशारा दिला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार रशिया स्पेनस फ्रान्स वा इटला सारख्या भूमध्य सागरी देशांपैकी कोणा एका देशावर रशियने ड्रोन हल्ले किंवा हायब्रिड हल्ल्याची तयारी करु शकतो. ही माहिती युरोपीयन देशांना देण्यात आली आहे. या हल्ल्यात समुद्रातून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा उल्लेख आहे. ड्रोनला जहाजांवर कंटेनरमध्ये लपवून आणले जाऊ शकतो. आणि समुद्रातून लाँच केले जाऊ शकते. लिथुआनियाचे संरक्षण मंत्रालयाच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रोन गेरबेरा प्रकारचे असून शकतात. त्यांचे वजन सुमारे १८ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

या ड्रोनची रेंज ६०० किलोमीटरपर्यंत असू शकते. एक व्यापारिक जहाजावर अनेक असे ड्रोन लादून आणले जाऊ शकतात. ही माहिती सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी २५ ऑगस्ट रोजी मॉस्कोच्या दौऱ्यानंतर लागलीच लिथुआनिया आणि अन्य देशांना मिळाली. जॉन रॅटक्लिफ अमेरिकन सैन्य दलाच्या विमानाने गेले होते, हे विमान वाटेत रिगा येथे थांबले होते.

समुद्रातून ड्रोन हल्ला का चिंताजनक ?

पारंपारिक हवाई हल्ल्याच्या तुलनेत समुद्रातून लपलेले ड्रोन लाँच करणे जास्त जटिल आणि लपवण्यासाठी सोपे असू शकते. व्यापारी जहाजांवर कंटेनर लादणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. यामुळे यात ड्रोन लपवल्याचे समजणे अवघड आहे. गेरबेरा सारख्या छोट्या ड्रोनची रेंज ६०० किमीपर्यंत असल्याने किनाऱ्यापासून खूप दूर समुद्रात राहूनही लक्ष्यावर हल्ले करता येणे शक्य आहे.

एका जहाजावर अनेक ड्रोन एक लादणे शक्य असल्याने एक साथ अनेक लक्ष्यांना टार्गेट केले जाऊ शकते. तसेच एका भागात सातत्यपूर्ण हल्ले करणे सोपे होऊ शकते. युरोपियन देशांसाठी हा धोका सर्वात मोठा आहे. कारण स्पेन, फ्रान्स आणि इटली भूमध्यसागरातील महत्वपूर्ण देश आहे.

येथे मोठी बंदरे, सैन्य अड्डे, ऊर्जा सुविधा आणि घनदाट लोकसंख्येची शहरे आहेत. जर कोणताही ड्रोन हल्ला झाला तर न केवळ फिजिकट नुकसान होईल तसेच क्षेत्रातील सुरक्षेचे वातावरण देखील बिघडू शकते. गुप्त माहितीनुसार हा हल्ला कोणा एका देशावर केंद्रित होऊ शकतो. परंतू याने संपूर्ण युरोपात सावधानता बाळगली जात आहे.

रॅटक्लिफ यांचा मॉस्को दौरा आणि माहितीची वेळ

सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या २५ ऑगस्ट रोजीच्या मॉस्को दौऱ्यानंतर हा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या विमानाचा रिगा येथील थांबा देखील चर्चेचा विषय बनला होता. रशियासोबतच्या तणावामुळे लिथुआनियासारखे बाल्टिक देश आधीच हाय अलर्टवर आहेत.जॉन रॅटक्लिफ यांच्या दौऱ्यानंतर लगेचच आलेल्या या माहितीमुळे, अनेक निरीक्षकांनी याचा संबंध अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या आकलनाशी जोडला आहे. दौऱ्याचा उद्देश आणि इशारा यांच्यातील थेट संबंध अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेला नाही.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना