अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात शांतता करार झाले आहेत. यादरम्यानच इराणच्या सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी मोठा दावा केला. खामेनेई यांच्या या दाव्यानंतर इराणचा थयथयाट बघायला मिळाला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट मोठा खुलासाही केला.

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट..
Donald Trump
| Updated on: Jun 20, 2026 | 7:53 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करार झाला आहे. मात्र, यांच्यातील तणाव अजून कमी झाला नाही.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर जोरदार टीका केली. हेच नाही तर या युद्धात इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले. हेच नाही तर इराणचे टेन्शन वाढवणारे भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आले. अमेरिकेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत इराणला करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इराणला आर्थिक मदत अमेरिका करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता अमेरिकेने हातवर केल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेला अजिबात एक पैशांचीही मदत करणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. इराणने अमेरिकेला झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली होती. मात्र, त्यानंतर इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी थेट अमेरिकेला युद्ध थांबवण्याची घाई होती, असे थेट विधान केले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आता इराणकडे काहीच राहिले नाही. त्यांची रडार सिस्टम पूर्णपणे उद्धवस्थ झाली. सैन्य ताकदही उरली नाही. थोडीफार त्यांची वायू सैना राहिली आहे. बाकी त्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही. युद्ध थांबवण्याची घाई आम्हाला कधीच नव्हती तर इराणला होती. अमेरिकेला कोणत्याही कराराची घाई नव्हती.इराणलाच आमच्यासोबत चर्चा करायची होती. ते पूर्णपणे संपले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, अमेरिका कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत इराणला करणार नाही. खामेनेई यांनी म्हटले होते की, मी सुरूवातीपासूनच कराराच्या विरोधात होतो. पण राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि सुप्रीम नॅशनल सिक्योरिटी काउंसिल यांनी मला या कराराबद्दल विश्वास दाखवला. त्यानंतर मी कराराकरिता मंजूरी दिली.

खामेनेई यांच्या या विधानावरच डोनाल्ड ट्रम्प भडकले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अमेरिकेला कराराची घाई नव्हती. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पण तणाव कायम आहे. सर्व जगालाच माहिती आहे की, इराण आणि अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव होता. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने जागतिक बाजाराची वाट लागली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us