
अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन गुप्त अहवालांनी अमेरिकेला हादरवून सोडले आहे. त्यामुळे अमेरिका तेहराणवर हल्ला करण्याआधी प्रचंड सावधानता बाळगत आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत त्यांच्या दोन मोठ्या विमानवाहू नौकांना तैनात केले आहे. अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण अमेरिकेचे मित्र देश असलेल्या सौदी, युएई, कुवैत, जॉर्डन, तुर्कीवर येथील अमेरिकन तळांवर हल्ला करु शकते. त्यामुळे इस्राईलने इराणवर आधी हल्ला करावा असा अमेरिकेचा प्लान आहे.
पॉलिटिकोच्या मते व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे की इराणशी इस्राईलने युद्ध पुकारावे अमेरिकेने नंतर इस्राईलच्या समर्थनार्थ युद्धात उतरावे अशी योजना आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रशियाच्या मध्यस्थीने इस्राईलने इराणसोबत एक सामंजस्य करार केला होता. यात म्हटले होते की कोणताही देश कोणत्याही देशावर आधी हल्ला करणार नाही.
1. जेएल पार्टनर्सने अलिकडे एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेत सामील ५४ टक्के लोकांनी इराणवर हल्ला करण्याचे समर्थन केले होते. सुमारे ३९ टक्के लोकांचे म्हणणे होते की इराणशी युद्ध लढणे सोपे नाही. यात ८ टक्के रिपब्लिकन समर्थक देखील आहेत. समर्थन करणाऱ्या बहुतांशी अमेरिकन लोकांचे म्हणणे आहे की या युद्धात आम्ही एकाही अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूला सहन करु शकत नाही. म्हणजे युद्ध व्हावे परंतू अमेरिकेचे नुकसान न होता.
सध्या जी स्थिती बनली आहे त्यात हे घडण्याची शक्यता कमी आहे. तर अमेरिका इराणशी युद्धात थेट उतरला तर त्यांच्या बेसवर इराण हल्ला करणार. अशा स्थितीत अमेरिकेचे खूप जास्त नुकसान होऊ शकते. पॉलिटिकोच्या मते अमेरिकेची इच्छा आहे की इराणशी इस्राईलने युद्ध पुकारावे. व्हाईट हाऊस केवळ सहयोगाची भूमिका करु इच्छीत आहे.
2. चीन टुडेच्या मते बीजिंगचा इराणशी तणाव सुरु असताना बीजिंगने थेट अमेरिकेला धमकावले आहे. चीनने स्पष्टपणे सांगितले की जर तुम्ही इराणवर हल्ला कराल तर आम्ही रेअर मेटलची निर्यात थांबवू, चीनने जर असे केले तर अमेरिकेचा शस्रास्र उद्योग ठप्प पडेल.
अमेरिका मिसाईल आणि फायटर जेट तयार करण्यासाठी रेअर मेटलचा वापर करतो. एवढेच नाही चीन देखील इराणला हायपरसॉनिक सीएम – ३०० मिसाईल विकण्याच्या तयारीत आहे. हा मध्य पूर्वेसाठी योग्य संकेत नाही.
3. वाशिंगटन पोस्टने एक बातमी दिली आहे. त्यात म्हटले आहे की सैन्य हल्ल्याने इराणमध्ये सरकार बदलणार नाही. इराणमध्ये सरकार बदलण्यासाठी सध्या जनता तयार नाही. जानेवारी २०२६ मध्ये सीआयएने एक गुप्त रिपोर्ट सोपवला होता.
सीआयएच्या या रिपोर्टमध्ये म्हटले होते की इराणची जनता आता खामेनेई यांचे सरकार बदलण्यास तयार नाही. इराणमध्ये इस्लामिक गणराज्य वाचवण्यासाठी खामेनेई यांनी मजबूत घेराबंदी केली आहे.यासाठी सर्व मोठ्या अधिकाऱ्यांचे ४-४ उत्तराधिकारी आधीच निवडून ठेवले आहेत.