भारताला झटका, मालदीवचे चीनला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट मोठा प्रकल्पच..

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सुधारताना दिसत आहेत. मात्र, पुन्हा एकदा मालदीवने असे काही केले की, भारताला धक्का बसला. चीनच्या अधिक जवळ जाताना मालदीव दिसत आहे.

भारताला झटका, मालदीवचे चीनला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट मोठा प्रकल्पच..
Maldives India and Maldives
| Updated on: Sep 08, 2026 | 1:19 PM

मालदीव गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. नुकताच मालदीवचे पंतप्रधान मुइज्जू यांनी भारताचे आभार मानले. भारत आणि मालदीवचे संबंध मजबूत असल्याचेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे चीनसोबत मैत्री निभावताना मालदीव दिसत आहे. मालदीवने एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प चीनकडे दिला आहे. चीनच्या सरकारी कंपनीला त्यांनी हा प्रकल्प दिला. रिपोर्टनुसार, थिलाफुशी पोर्टचे काम चीनच्या सरकारी कंपनीकडे मालदीवने दिले. चीन हार्बर इंजिनिअरिंगला हे काम देण्यात आले. इंडिया आऊट कॅंपेन चालून त्यांनी मोठे संकेत दिले. मात्र, एकीकडे भारतासोबत चांगले संबंध ठेवायचे तर दुसरीकडे चीनसोबतही. मालदीवच्या सरकारी कंपनीने मालदीव पोर्ट्स लिमिटेडने चीनची कंपनी CHEC सोबत करार केला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून 5 हेक्टेअर पोर्टचा विस्तार केला जाईल. भारत थियाफुशी व्दिपला पोहोचण्यासाठी चांगला रस्ता तयार करत आहे. तर दुसरीकडे व्दिपच्या विकासाचे काम मालदीवने चीनला दिले. ज्या ज्यावेळी मालदीवला मदत लागली, त्यावेळी भारताने मालदीवची साथ दिली. मात्र, ते सर्व विसरून मालदीव चीनचा मोठे प्रकल्प देत आहे. भारताने मालदीवला 400 मिलियन डॉलर स्वॅप व्यवस्था आणि आरबीआयच्या माध्यमातून 3000 कोटींची आर्थिक मदत केली.

मालदीवकडून भारताचे आभार मानण्यात आले. मात्र, मालदीव एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवत आहे. भारतासोबत पंगा घेताना मालदीव दिसत आहे. भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने मालदीवला जातात. मात्र, मालदीव भारताविरोधात भूमिका घेत आहे. भारताने अनेकदा मालदीवला मदत केली. त्यातच चीनकडून झुकताना मालदीव दिसत आहे.

चीनला मोठे प्रकल्प देताना मालदीव दिसत आहे. फक्त भारताचे आभार मानायचे तर दुसरीकडे थेट गिफ्ट चीनला द्यायचे, अशी भूमिका आता मालदीवची झाली आहे. मालदीव विरोधात भारत नक्की काय भूमिका घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मागील काही वर्षांचा विचार केला असता भारत आणि चीनच्या संबंधात मोठी सुधारणा झाली. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशाचे संबंध अधिक सुधारताना दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us