AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Bhide : दहीहंडीत बायका नाचवणारे देशद्रोही, डॉल्बी फेकून द्या; संभाजी भिडेंचा हल्लाबोल

दहीहंडीत बायका नाचवणाऱ्यावर संभाजी भिडे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच डॉल्बी फेकून द्या, असेही त्यांनी सांगितलं.

Sambhaji Bhide : दहीहंडीत बायका नाचवणारे देशद्रोही, डॉल्बी फेकून द्या; संभाजी भिडेंचा हल्लाबोल
sambhaji bhide newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 1:52 PM
Share

राज्यात डिजेबंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात प्रथम डिजेबंदीची मागणी केल्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यात मागणीचा सूर पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात डीजेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता इतरही जिल्ह्यात मागणी केली जात आहे. त्यात दहीहंडी उत्सवात काही आयोजकांच्या स्टेजवर डान्सर नाचल्या होत्या. त्यावरून जोरदार टीका होत आहे. यावरून आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.

संभाजी भिंडे यांनी टाकळीतून माध्यमांशी संवाद साधला. संभाजी भिडे म्हणाले, ‘डीजे आणि डॉल्बी फेकून दिले पाहिजे. त्याचा काय फायदा, त्यातून देशाला काय मिळते. काही गोष्टी टाळल्या पाहिजे, त्यात डॉल्बी आहे. सणामध्ये अश्लील डान्स करणारे, बायका नाचवणे, असले प्रकार करणारे मुर्ख आहेत. देशद्रोही आहेत. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. दहीहंडी सणांमध्ये बायका नाचवणारे देशद्रोही आहेत. त्यांनी चुकीचं काम केलं आहे’. संभाजी भिडे यांनीही आता डिजेबंदी विरोधात भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

टाकळीच्या प्रस्तावित एमआयडीसीला भिडेंचा विरोध 

सैनिक टाकळीमध्ये होऊ घातलेल्या MIDC ला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, या एमआयडीसीला पाठिंबा म्हणजे पाकिस्तानला पाठिंबा आहे. जमत नाही. देशासाठी जगणारी जात ही मराठा जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. मी बोलत नाही हे लोकांच मत आहे. ते कोणीही असोत. सैनिक टाकळीला सैनिकी पेशाची आग आहे, ती वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आम्हाला एमआयडी नको. भारत मातेच्या कपाळावरील स्वातंत्र्याचं कुंकू टिकवण्यासाठी जगणारी जात म्हणजे सैनिक. त्याचबरोबर हिंदूस्थानचे भूषण हे गाव आहे. हा देश स्वातंत्र्य होताना चौदा तुकडे बाजूला गेले. ते पुन्हा एकत्र आणू. अखंड हिंदूस्थान निर्माण करण्याची आग असणारी लोक आहेत’.

Follow Us
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल