Nvidia च्या शेअरमध्ये 5.75% मोठी घसरण, CEO जेनसेन हुआंग यांचे चीनी गुप्तचराशी संबंध उघड झाल्यानंतर हडकंप
CEO जेनसेन हुआंग आणि चीनी महिला गुप्तचर यांच्या दरम्यान संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यात चिंता वाढली आहे. या बातम्यानंतर शेअरबाजारात Nvidia चे शेअर घसरले आहेत.

मायक्रो चिप तयार करणारी दिग्गज अमेरिकन कंपनी Nvidia च्या शेअरमध्ये सोमवारी ‘आऊट-ऑफ-आवर्स’ ट्रेडिंगच्या दरम्यान 5 टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. ही घसरण एका चौकशीच्या घोषणेनंतर झाली आहे. ही चौकशी कंपनीचे सीईओ जेनसेन हुआंग यांना कोणा विदेशी गुप्तचर ऑपरेशन अंतर्गत टार्गेट तर केले गेले नाही ना ? याची होणार आहे. सीईओ जेनसेन हुआंग आणि चीनी गुप्तचर महिलेचे संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
एनवीडियाच्या शेअरमध्ये 5.75 टक्के मोठी घसरण
हायपरलिक्विड प्लॅटफॉर्म आणि ब्लू ओशन अल्टरनेटिव्ह ट्रेडिंग सिस्टम (BOATS) वरील एनव्हिडिया-संबंधित पर्पेच्युअल फ्युचर्स आफ्टर-आवर्स ट्रेडिंगमध्ये सुमारे $175.97 वर ट्रेड करत होते, जे नॅसडॅकवरील शुक्रवारच्या $186.64 च्या क्लोजिंग किमतीपेक्षा $10.74 किंवा 5.75 टक्क्यांची घसरण दर्शवतात.
एका महत्वाच्या कंपनीचे सीईओ जेनसेन हुआंग आणि चीनी महिला गुप्तचराच्या दरम्यान असलेल्या संबंधाच्या बातम्यांनी कंपनीची लीडरशिपबद्दल चिंता वाढली आहे. हे अशा समयी झाले आहे जेव्हा एनवीडिया कंपनी जागतिक पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)च्या विस्तारात खास करुन सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर बाजारात एक प्रमुख कंपनी बनली आहे.
एनवीडिया सुरु केली चौकशी
एनवीडिया कंपनीने संपूर्ण प्रकरणात रविवारी एक इंटर्नल कॉर्पोरेट चौकशी सुरु केली आहे. हुआंग यांचे संबंध एका चीनी महिला व्यावसायिकाशी असल्याच्या बातम्या आल्यानंतर एनवीडिया कंपनीने ही चौकशी सुरु केली आहे. या महिला व्यावसायिक गुप्तचराने चीनला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. बातम्यानुसार हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनीचे सीईओ जेनसेन हुआंग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या पत्नीला धोका दिला आहे. मात्र, त्यांनी या संदर्भात अन्य कोणतीही माहिती दिलेली नाही.
प्रकरण उघड झाल्यानंतर बाजारात अनिश्चितता
एनवीडियाच्या शेअरवर या घटनांचा परिणामा संदर्भात तज्ज्ञांनी म्हटले आहे की या स्थितीने बाजारात एक अनिश्चितता वाढवली आहे. ते म्हणाले की, बाजार असा संकेत देत असावा की, डेटा सेंटर्सच्या उभारणीबाबत मोठ्या प्रमाणात दावे प्रतिदावे केले जात असताना, ही घटना कंपनीच्या शेअरसाठी चांगले संकेत नाहीत.
कंपनीच्या लीडरशिपमध्ये तात्काळ कोणताही बदल नाही
मात्र, एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की या घटनेनंतर कंपनीच्या नेतृत्वात लागलीच बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर गुंतवणूकदारांना खरोखरच असे वाटते की सीईओ आपल्या पदाचा राजीनामा देण्यास जाणार आहेत, तर शेअरमध्ये ब्लडबाथ ( खूपच घसरण ) पाहायला मिळाली असती.