याला म्हणतात श्रीमंती… झटक्यात 1000 कोटीचं घेतलं घर; कोण आहेत मनुजेंद्र शाह?

दिल्लीतील लुटियन्स परिसरात असलेल्या एका अलिशान हवेलीची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण ती हवेली 1000 कोटी रुपयांची असून ती मनुजेंद्र शाह यांनी घेतली आहे.

याला म्हणतात श्रीमंती... झटक्यात 1000 कोटीचं घेतलं घर; कोण आहेत मनुजेंद्र शाह?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 13, 2026 | 4:09 PM

King Palace Sold : दिल्लीतील लुटियन्स परिसरात असलेली एक ऐतिहासिक आणि आलिशान हवेली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भगवान दास रोडवरील प्लॉट क्रमांक 5 येथे तब्बल 3.2 एकरांवर पसरलेली ही प्रॉपर्टी सुमारे 1000 कोटी रुपयांना विक्रीसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हवेली ‘टिहरी हाउस’ या नावाने ओळखली जाते. ही मालमत्ता मनुजेंद्र शाह यांची आहे. ते टिहरी-गढवाल संस्थानाचे महाराज म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या घराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीतील ही हवेली पूर्वी टिहरी गढवाल राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होते.

मनुजेंद्र शाह आपल्या शाही जीवनशैलीसाठी आणि ऐश्वर्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना महागड्या आणि विंटेज कार्सची विशेष आवड आहे. त्यांच्या संग्रहात BMW, पोर्श यांसारख्या लक्झरी कार्ससोबतच अनेक दुर्मिळ विंटेज गाड्यांचा समावेश आहे. देश-विदेशात होणाऱ्या कार रॅलींमध्ये ते नियमितपणे सहभागी होतात तसेच काही रॅलींचे आयोजनही करतात. याशिवाय ते अनेक प्रतिष्ठित क्लब आणि उच्चभ्रू सामाजिक संस्थांचे कायमस्वरूपी सदस्य आहेत.

राजकीय वारसा

मनुजेंद्र शाह यांची पत्नी माला राज्य लक्ष्मी शाह या टिहरी गढवाल येथून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. त्यांचे सासरे मानवेंद्र शाह हे टिहरी गढवालचे अखेरचे नरेश होते. मानवेंद्र शाह यांनीही अनेकदा खासदार म्हणून काम केले होते. आता त्यांचा राजकीय वारसा माला राज्य लक्ष्मी शाह पुढे नेत आहेत.

दिल्लीतील टिहरी हाउस व्यतिरिक्त मनुजेंद्र शाह यांच्या मालकीच्या आणखी काही आलिशान मालमत्ता आहेत. त्यामध्ये नरेंद्रनगर पॅलेस, आनंदा आणि नरेंद्रनगर येथील रिज हाऊस यांसारख्या ऐतिहासिक आणि भव्य संपत्तींचा समावेश आहे.

1000 कोटींची ऐतिहासिक डील

दिल्लीतील या हवेलीची डील अंतिम टप्प्यात पोहोचली असून सुमारे 1000 कोटी रुपयांत व्यवहार निश्चित झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, हीच मालमत्ता त्या उद्योगपतीने खरेदी केल्याची चर्चा आहे ज्याने भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या निवासस्थानाच्या खरेदीसाठी 1100 कोटी रुपयांचा करार केला होता. ऐतिहासिक वारसा आणि शाही ओळख असलेली ही हवेली आता नव्या मालकाकडे जाणार आहे. लुटियन्स दिल्लीतील या व्यवहारामुळे राजधानीतील रिअल इस्टेट बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.