आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आनंदाची बातमी, भारताने दाखवली जगाला ताकद, थेट अमेरिकेसोबतच चीनही..

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर असे सांगितले जात होते की, भारताच्या अर्थव्यवस्थेला थेट झळ सहन करावी लागेल. मात्र, आता भारताने संपूर्ण जगाला भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. जगाला धक्का देणारी आकडेवारी पुढे आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आनंदाची बातमी, भारताने दाखवली जगाला ताकद, थेट अमेरिकेसोबतच चीनही..
US tariffs on the Indian market
| Updated on: Dec 16, 2025 | 1:02 PM

भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. मात्र, रशियाचे तेल फक्त कारण होते. रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. भारतावर टॅरिफ लावून डोनाल्ड ट्रम्प हेच तोंडावर पडले आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा कोणत्या व्यवसायावर या टॅरिफचा फार काही परिणाम पडला नाही. उलट भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात प्रचंड वाढली आहे. दोन्ही देशातील व्यापाऱ्यांनी या टॅरिफमधून मार्ग काढला आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का आहे. भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीचे आकडे पाहून डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडेल.

भारतातून निर्यात होणाऱ्या मालामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल होते. डोनाल्ड ट्रम्प  यांच्या टॅरिफची हवा निघाली. भारताने या आकडेवारीच्या माध्यमातून अमेरिकेला नक्कीच अत्यंत मोठा धक्का दिला आहे. शिवाय अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केली. त्यापैकी चीन एक आहे. चीनमधील भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली.

आकेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात निर्यात 38.1 बिलियन डॉलर राहिली. हा तीन वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 7 बिलियन डॉलर म्हणजे 22.6 टक्के वाढ दिसत आहे. यामुळे टॅरिफचा झिरो परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. हेच नाही तर यादरम्यान भारताने चीनमध्येही निर्यात वाढवली आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनचे विदेश मंत्री भारताच्या दाैऱ्यावर आले आणि त्यांनी महत्वपूर्ण करार भारतासोबत केले.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे कधी नाही ते चीन आणि भारत एकत्र आल्याचे बघायला मिळाले. नोव्हेंबर महिन्यात भारताने चीमध्ये 2.2 बिलियन डॉलरची निर्यात केली. चीन आणि भारताच्या व्यापारात 90 टक्के वाढ आहे. अमेरिकेच्या विरोधात भारताच्या बाजूने चीन उभा होता आणि अमेरिकेच्या टॅरिफचा थेट विरोध केला. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करारही केली आहेत. ज्याचा थेट फायदा भारताला होताना दिसत आहे.