संकटाची मालिका थांबेना… आंतरराष्ट्रीय विमानतळ भराभरा पेटलं… लोक बोंब मारत सुटले; त्यानंतर घेतला मोठा निर्णय

Dhaka Airport Fire: बांगलादेशातील ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आगीच्या या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

संकटाची मालिका थांबेना... आंतरराष्ट्रीय विमानतळ भराभरा पेटलं... लोक बोंब मारत सुटले; त्यानंतर घेतला मोठा निर्णय
Dhaka Airport Fire
| Updated on: Oct 18, 2025 | 7:32 PM

गेल्या काही काळात अनेक ठिकाणी विमान अपघात झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र आता बांगलादेशातील ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आगीच्या या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली, तसेच या आगीच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुपारी घडली घटना

बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.30 च्या सुमारास घडली विमानतळाच्या कार्गो व्हिलेजमध्ये आग लागली. या ठिकाणी आयात करण्यात आलेल्या वस्तू ठेवल्या जातात. या आगीबाबत विमानतळाचे कार्यकारी संचालक मोहम्मद मसुदुल हसन मसुद यांनी माहिती दिली, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असून उपाययोजना केल्या जात आहेत असं त्यांनी सांगितले. मात्र या आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले. अनेकजण आरडाओरडाही करत होते.

आगीचे कारण अस्पष्ट

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, अग्निशमन दल आणि बांगलादेश हवाई दलाच्या दोन युनिट्स आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे विमानतळावरील सर्व लँडिंग आणि उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. संबंधित अधिकारी परिस्थितीचे निरीक्षण करत आहे. मात्र अद्याप ही आग का लागली आणि यात किती नुकसान झाले याची माहिती समजू शकलेली नाही.

आग वेगाने पसरली

समोर आलेल्या माहितीनुसार, शाहजलाल विमानतळावरील पोस्ट ऑफिस आणि हँगरच्या मध्ये कार्गो व्हिलेज आहे. या कार्गो व्हिलेजला 12 दरवाजे आहेत. तसेच इम्पोर्ट कार्गो कॉम्प्लेक्सला तीन दरवाजे आहेत. यातील गेट क्रमांक 3 च्या शेजारील कॉम्प्लेक्सच्या उत्तरेला आग लागली. काही क्षणात ही आग वेगाने इमारतीत पसरली.

या घटनेबाबत बोलताना लोडिंग आणि अनलोडिंग कंपनी व्हॉयेजर एव्हिएशनचे चालक मोहम्मद रसेल मोल्ला यांनी म्हटले की, ‘आग लागली तेव्हा माझी कार गेट क्रमांक 8 च्या 100 मीटर आत होती. यानंतर मा गाडी त्वरित हटवली. आता प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.’ दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.