डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धाचा गेम उलटला, अमेरिकेचा सगळा खेळ बिघडला; राष्ट्राध्यक्षांचं टेन्शन वाढलं
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धाचा गेम उलटल्याचे दिसत आहे. महागाईने अमेरिकेचा सगळा खेळ बिघडला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्षांचं टेन्शन वाढलं आहे.

पश्चिम आशियातील इराण विरुद्ध अमिरेकेचं युद्ध संपेना झालं आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आता अमेरिकेला देखील फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा दावा करत आहेत. परंतु इराणच्या विरोधात युद्ध जिंकणार असल्याच्या दाव्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. इराणच्या विरोधातील युद्धामुळे अमेरिकेवर परिणाम होत आहे. अमेरिकेतही महागाई गगनाला भिडल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत रियल इस्टेट व्यवसाय थंडावला आहे. अमेरिकेच्या बाजारातील पडझडीमुळे महागाई, इंधनाच्या किंमती, व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. किराणा दुकानातील वस्तू महागल्या आहेत. पंपावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे. वाढत्या कर्जामुळे गृहनिर्माण, घर खरेदी-विक्री व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे.
अमेरिकेत महागाई उच्चांकी पातळी गाठताना दिसत आहे. डिझेलच्या किंमतीने उच्चांकी पातळी गाठल्याचे समोर आलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत मोठी महागाई झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) 3.4 टक्क्यांनी वाढला आहे. मागील महिन्यात 0.1 टक्के वाढीच्या तुलनेत जुलै ते ऑगस्ट काळात किमती ०.४ टक्क्यांनी वाढल्या. तर कोरोना काळानंतर किंमतींमध्ये पहिल्यादांच मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळाला पाच वर्ष लोटल्यानंतरही महागाई उच्च पातळीवर असल्याचे आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेमधील या महागाईमुळे फेडरल रिझर्व्ह बँकेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. एकीकडे अमेरिकेत मध्यावधी निवडणुका जवळ येत आहे. त्याचदरम्यान ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराबद्दल अंसतोष वाढत असल्याचे दिसत आहे.
डिझेलच्या दरात वाढ
अमेरिकेत शुक्रवारी डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होताना दिसत आहे. डिझेलची किंमत प्रति गॅलन 6 डॉलरपेक्षा जास्त वाढल्याची माहिती आहे. खरंतर अमेरिकेत राष्ट्रीय सरासरी किंमत ही 6.05 डॉलर आहे. परंतु गेल्या आठवड्यात किंमत ही 5.85 डॉलरवर पोहोचली. ही किंमत गेल्या वर्षी याच कालावधीतील 3.70 डॉलर प्रति गॅलनपेक्षा अधिक आहे.