चीनचा क्रूर चेहरा, डॉग मीट फेस्टिव्हलसाठी कापणार तब्बल 5 हजार कुत्रे, जगभरातून टीकेची झोड

| Updated on: Jun 21, 2021 | 10:47 PM

मिळालेल्या माहितीनुसार चीमध्ये डॉग मीट फेस्टिव्हल साजरा केला जाणार आहे. फेस्टिव्हलच्या या दहा दिवसांमध्ये चीनमध्ये तब्बल पाच हजार कुत्रे मारले जाणार आहेत. युलीन शहरात हा फेस्टिव्हल पार पडणार आहे.

चीनचा क्रूर चेहरा, डॉग मीट फेस्टिव्हलसाठी कापणार तब्बल 5 हजार कुत्रे, जगभरातून टीकेची झोड
Follow us on

Dog Meat Festival in China : सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक देशात कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, हे संकट संपले नसले तरी चीनमध्ये मोठे-मोठे उत्सव थाटात साजरे केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीमध्ये डॉग मीट फेस्टिव्हल साजरा केला जाणार आहे. फेस्टिव्हलच्या या दहा दिवसांमध्ये चीनमध्ये तब्बल पाच हजार कुत्रे मारले जाणार आहेत. युलीन शहरात हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. (Dog meat festival will be celebrated in Yulin China amid Corona pandemic)

उत्सवासाठी कुत्र्यांची जमवाजमव

चीनमधील युलीन शहरात डॉग मीट फेस्टिव्हलची तयारी मोठ्या जोमात सुरु आहे. येथे चीनच्या विविध भागामधून कुत्रे आणले जात आहेत. काही ठिकाणी तर हा फेस्टिव्हल प्रत्यक्ष सुरु होण्यापूर्वीच कुत्र्याचे मांस विकणे सुरु करण्यात आले आहे. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल (Humane Society International) या संस्थेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार युलीन शहराच्या डोंगकोऊ बाजारात अशी आठ दुकाने सापडली आहेत. तर मांकियाओ बाजारात 18 दुकानांमधून कुत्र्याच्या मांसाची विक्री होत आहे.

फेस्टिव्हल सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक

कुत्रे मारण्याच्या या फेस्टिव्हलमुळे चीनवर संपूर्ण देशातून टीका होत आहे. ह्यूमन सोसायटी इंटनॅशनलच्या चीन पॉलिसी स्पेशालिस्ट डॉ. पिटर ली यांनीसुद्धा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “सध्या कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. मात्र, कसलीही भीती न बाळगता उत्सवाच्या नावाखाली कुत्र्याची मांस खरेदी केली जात आहे. तसेच कुत्र्याचे मांस आवडीने खाल्ले जात आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हे धोकादायक आहे,” असे पीटर ली यांनी म्हटलंय.

कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी विविध संस्थांकडून प्रयत्न

दरम्यान, उत्सवाच्या नावाखील चीनमध्ये दहा दिवसांत एकूण पाच हजार कुत्रे मारणार असल्याचे समजताच चीनमधील तसेच काही आंतरराष्ट्रीय संस्थानी पकडून आणलेल्या कुत्र्यांना मुक्त करण्याचे काम सुरु केले आहे. जमेल तशा पद्धतीने या संस्था कुत्र्यांना मृत्यूपासून वाचवत आहेत. ज्या वाहनामधून कुत्र्यांची वाहतूक केली जाते, अशा वाहनांना या संस्था पकडतात. तसेच सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे या संस्था वाहनचालकांना ट्रांसपोर्टची परवानगी, क्वॉरन्टाईन तसेच आरोग्याविषयीचे ताजे कागदपत्रे विचारतात. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून वाहनचालक मारण्यासाठी आणलेले कुत्रे संस्थेच्या कार्यकर्त्यांना देतात. अशा प्रकारे चीनमधील काही लोक कुत्र्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवत आहेत.

इतर बातम्या :

ब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण

इस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर

कोवॅक्सिनला मोठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार?

(Dog meat festival will be celebrated in Yulin China amid Corona pandemic)