ब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण

ब्रह्मांडात सर्वात मोठी फिरणारी वस्तू, प्रति तास 3.6 लाख किमी वेग पाहून संशोधकही हैराण


वॉशिंग्टन : सध्या ब्रह्मांडात फिरणारी सर्वात मोठी वस्तू संशोधकांना दिसलीय. तिचा वेग 3.6 लाख किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही वस्तू म्हणजे ब्रह्मांडात (Universe) लाखों प्रकाश-वर्ष अंतरापर्यंत पसरलेल्या अनेक आकाशगंगांचा (Galaxies) समूह असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका अभ्यास अहवालात देण्यात आलीय. ग्रह असो की तारे किंवा आकाशगंगा त्या अवकशात फिरत असतात. (Astronomers discover largest spinning structures with speed of 360000 km per hour in universe)

नव्या संशोधनात लिब्सकिंड आणि त्यांच्या संशोधकांना आकाशगंगांपासून तयार झालेल्या फिरत्या मोठ्या ट्यूब्स दिसल्या आहेत. काही संरचना इतक्या मोठ्या असतात की त्यांच्यासमोर आकाशगंगा धुळीच्या कणासारख्या दिसतात. या मोठ्या ट्यूब्स आकाशगंगांच्या समुहाची तुलना करता खूप मोठ्या असतात. आधी केलेल्या संशोधनात जवळपास 13.8 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग (महास्फोट) झाल्यानंतर ब्रह्मांडाचा जन्म झाला. यानंतर ब्रह्मांडातील बहुतांश पदार्थाला तयार करणारे वायू विशाल चादरी तयार करण्यासाठी संपला. या चादरी या मोठ्या ट्यूब्स बनवण्यात खर्च झाल्या.

3.6 लाख किमी प्रतितास वेगाने फिरणारी वस्तू

स्लोअन डिजिटल स्काय सर्वेच्या माहितीचा उपयोग करुन वैज्ञानिकांनी 17,000 पेक्षा अधिक फिलामेंट्स असणाऱ्या ट्यूब्सचा शोध लावला आहे. या महाकाय ट्यूब बनवणाऱ्या आकाशगंगा वेगाने प्रत्येक टेंड्रिलमध्ये सामावल्या गेल्या. या आकाशगंगा ज्या पद्धतीने फिरत आहेत त्यावरुन त्या प्रत्येक फिलामेंटच्या केंद्रीय अक्षाच्या चारही बाजूंनी फिरत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. या आकाशगंगा वेगाने या टेंड्रिल्सच्या पोकळ केंद्राच्या अवतीभोवती फिरत असल्याचं शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलंय. यावेळ त्यांचा वेग 3,60,000 किलोमीटर प्रतितास होता. यावरुन ब्रह्मांडात अशा अनेक फिरणाऱ्या वस्तू अस्तित्वात आहेत, असाही अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

Universe Nurseries: तुम्ही ‘ब्रह्मांडाची नर्सरी’ पाहिलीय का? येथे अनेक ताऱ्यांचा जन्म होतो, पाहा फोटो

ब्रह्मांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट, ताऱ्याचं रुपांतर ब्लॅक होलमध्ये, दुर्मिळ घटना कॅमेरात कैद

व्हिडीओ पाहा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI