AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोवॅक्सिनला मोठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार?

ओक्यूजेन आयएनसी कंपनीनं सांगितलं की कोवॅक्सिन लसीच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून एफडीएच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त आकडेवारीसह कंपनी बीएलए अर्ज दाखल करेल.

कोवॅक्सिनला मोठा झटका, अमेरिकेच्या एफडीएनं आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारली, लसीला परवानगी कशी मिळणार?
कोव्हॅक्सिन
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 11, 2021 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली: भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या आतप्कालीन वापराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकन अन्न व औषध प्रशासनानं (FDA)फेटाळला आहे. भारत बायोटेकची अमेरिकतील सहकारी कंपनी ओक्यूजेन आएनसीनं लसीच्या वापराला परवानगी मिळणवण्यासाठी बायोलॉजिक्स लायसन्स अ‌ॅप्लिकेशन करणार असल्याच सांगितलं आहे. ओक्यूजेन आयएनसी ही भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी आहे. आपत्कालीन वापराच्या परवानगीचा अर्ज नामंजूर केल्यानंतर एफडीएनं कंपनीला मार्ग सुचवला आहे. (American FDA rejects Bharat Biotech covaxin eua application)

कोवॅक्सिनला परवानगी कशी मिळवणार

ओक्यूजेन आयएनसी कंपनीनं सांगितलं की कोवॅक्सिन लसीच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून एफडीएच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त आकडेवारीसह कंपनी बीएलए अर्ज दाखल करेल. एफडीएकडून बीएलए अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे त्यानुसार लसींच्या वापराला मंजुरी दिली जाते. त्यामुळे अमेरिकेतील कोवॅक्सिन लसीच्या मंजुरीसाठी अजून वेळ जाऊ शकतो.

आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी अर्ज करणार नाही

पीटीआयनं दिलेल्या बातमीनुसार ओक्यूजेन आयएनसी आता एफडीएकडे कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज करणार नाही. कारण, एफडीएनं कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवनागनी साठीअर्ज करण्याऐवजी बायोलॉजिक्स लायसन्स अ‌ॅप्लिकेशनसाठी अर्ज करावा सल्ला दिला आहे. त्यानुसार बीएलएसाठी अर्ज केला जाईल. मात्र, ईयूएसाठी अर्ज केला जाणारल नाही.

ओक्यूजेननं दिलेल्या माहितीनुसार यामुळे कोवॅक्सिन लस अमेरिकेत लाँच करण्यास वेळ लागू शकतो. एफडीएशी झालेल्या चर्चेनुसार ओक्यूजेनला कोवॅक्सिन लसीच्या अतिरिक्त क्लिनिकल ट्रायल कराव्या लागणार आहेत. ओक्यूजेनचे सीईओ शंकर मुसुनुरी यांनी सांगतिलं की, एफडीएनं बीएलए लायसन्ससाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे. यामुळे थोडा वेळ लागेल, मात्र कोवॅक्सिन लस अमेरिकेत आणण्यास कटिबद्ध आहोत, असं शंकर मुसुनुरी म्हणाले. शंकर मुनुसुरी यांनी कोवॅक्सिन लस कोरोनाच्या वेगवेगळ्या वेरियंटवर प्रभावी आहे. ओक्यूजेननं कॅनडामध्येही कोवॅक्सिन लसीच्या परवानगीसाठी मंजुरी मागितली आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Vaccination Record | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी घोडदौड, दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 50 लाखांवर

(American FDA rejects Bharat Biotech covaxin eua application)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली