‘ट्रम्प कंडोम ₹407’, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी आल्यापासून त्यांच्याविरोधातील अनेक जुनी प्रकरणं सतत समोर येत आहे. त्यात त्यांचे कधीकाळचे खास मित्र जेफ्री एप्सटीन यांच्यामुळे तर ट्रम्प अधिक अडचणीत आले आहे. विरोधकांना एक मोठे कोलितच हाती लागले आहे.

ट्रम्प कंडोम ₹407, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर
डोनाल्ड ट्रम्प जेफ्री एपस्टी
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 13, 2025 | 3:23 PM

Donald Trump And Jeffery Epstein Photo: अमेरिकेच्या राजकारणात जेफ्री एप्सटीनचे भूत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानगुटीवर बसले आहे. हाऊस ओव्हसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी एप्सटीनकडील 19 छायाचित्र सार्वजनिकरित्या जाहीर केली. हे फोटो जगासमोर येताच एकच खळबळ उडाली. या नवीन फोटोमुळे ट्रम्प तात्यांच्या सिंहासनाला हादरे बसले. हे फोटो त्या जवळपास 95 हजार फोटोग्राफचा भाग आहे, जे एप्सटीन इस्टेटमधून ताब्यात घेण्यात आले. या फोटोनंतर ट्रम्प समर्थकांची मान खाली गेली आहे. तर दुसरीकडे ट्रम्प हे सारवासरव करताना दिसले. “मी ते फोटो पाहिले नाहीत. पण त्या माणसाला सर्वच ओळखतात. त्याच्याकडे सर्वांचीच फोटो होत. ही काही मोठी बाब नाही”, अशी ट्रम्प यांची बोबडी वळाली.

नवीन फोटोतून काय खुलासा?

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, समितीमधील डेमोक्रॅटिक सदस्यांचे वरिष्ठ नेते रॉबर्ट गार्सिया यांनी एक टिप्पणी केली आहे. त्यानुसार या फोटात अमेरिकेतील श्रीमंत आणि धनदांडग्यांचे एप्सटीन यांच्यासोबतचे संबंध समोर येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत याविषयीचे जे काही सत्य आहे, ते समोर आल्याशिवाय राहणार नाही, चौकशी तोपर्यंत थांबणार नाही.

या समितीने आतापर्यंत 19 फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प हे एकाचवेळी अनेक महिलांसोबत दिसतात. या महिलांचे चेहरे मात्र खुबीने लपविण्यात आले आहेत. तर एका दुसऱ्या फोटोत ट्रम्प हे एका महिलेसोबत दिसतात. तिची सार्वजनिक ओळख लपवण्यात आली आहे. तर एका फोटोत ट्रम्प आणि एप्सटीन यांचा दोस्ताना दिसत आहे. ते कोणत्यातरी विषयावर चर्चा करताना दिसतात. या दोघांच्या संबंधावरुन अमेरिकेत ट्रम्प यांची प्रतिमा मात्र डागळली आहे.

ट्रम्प कंडोम $4.50 (₹407)

तर या फोटोत अजून एक वादग्रस्त फोटो सापडला आहे. त्यात एका वाटीवर ट्रम्प कंडोम $4.50 (₹407) असे लिहिलेले आढळले आहे. तर लाल रंगाच्या वेस्टनावनर ट्रम्प यांचे खास कार्टुन पण चित्तारलेले आहे. या फोटोने ट्रम्प यांचा खरा गेम केला आहे. त्यांच्या विरोधकांना तर आयते कोलीत मिळाले आहे. हा फोटो अमेरिकाच नाही तर युरोपातील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्या काळात पौगांडावस्थेतील आणि लहान मुलींचे मोठे लैंगिक शोषण आणि छळ झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण या एका चित्रावरून, सूतावरून धागा पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन समितीने केले आहे. पण सध्याचा गदारोळ काही थांबण्याची चिन्ह नाहीत.