AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठ्या दुष्मनाला भेटले ट्रम्प, भारतावर प्रेम असणाऱ्या ममदानी यांची…. अमेरिकेत मोठ्या घडामोडी!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची भेट झाली आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. असे असताना त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

सर्वात मोठ्या दुष्मनाला भेटले ट्रम्प, भारतावर प्रेम असणाऱ्या ममदानी यांची.... अमेरिकेत मोठ्या घडामोडी!
DONALD TRUMP
| Updated on: Nov 22, 2025 | 3:11 PM
Share

Donald Trump And Zohran Mamdani : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमिरिकेतील सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची शुक्रवारी (22 नोव्हेंबर) भेट झाली. अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊस या अधिकृत निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. हे दोन्हीही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. ममदानी हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असून यांना भारताविषयी विशेष प्रेम आहे.   न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान झोहरान ममदानी यांनी ट्रम्प यांची फॅसिस्ट म्हणून संभावना केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनीदेखील ममदानी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. असे असताना आता ट्रम्प आणि ममदानी यांची भेट घडून आली आहे. दरम्यान ही भेट झाल्यानंतर मात्र ट्रम्प यांचा सूर बदलला आहे. ते चांगलेच नरमले असून ट्रम्प यांची बदललेली भूमिका पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प आणि झोहरान ममदानी यांच्यात झालेली ही बैठक चांगलीच सकारात्मक राहिली. या बैठकीत दोन्ही नेत्यांचे मतभेद समोर येतील आणि त्याचे पडसाद पत्रकार परिषदेत उमटतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु याऊलट दोन्ही नेत्यांनी आमच्यातील चर्चा सकारात्मक राहिली असे सांगितले. याआधी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्यावर डाव्या विचारसणीचा वेडा असे म्हणत जाहीरपणे टीका केललाी आहे. तर ममदानी यांनीदेखील ट्रम्प यांच्या धोरणांवर जाहीरपणे आक्षेप घेतलेला आहे. असे असले तरी ट्रम्प यांनी ममदानी यांचे व्हाईट हाऊसमध्ये जोरदार स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांत सकारात्मक बैठक झाल.

शहर कधी सुरक्षित होईल यासाठी प्रयत्न करणार

न्यूयॉर्क शहराच्या महारपौरपदाच्या निवडणुकीदरम्यान ममदानी निवडून आले तर मी न्यूयॉर्क शहारचा निधी रोखून धरेन, अशी उघड धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. आता मात्र त्यांनी न्यूयॉर्क शहराचा विकास करण्याबाबत तसेच हे शहर अधिक सुरक्षित कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. तसेच न्यूयॉर्क शहराच्या विकासासाठी मी ममदानी यांची मदत करेन. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी, मजबूत आणि सुरक्षित न्यूयॉर्कच्या निर्मितीसाठी मी ही मदत करणार आहे, असे ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

दुसरीकडे ममदानी यांनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ममदानी यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत आमच्यातील मतभेदांवर चर्चा झाली नाही. याऊलट न्यूयॉर्क शहरातील लोकांचे जीवनमान कसे चांगले होईल याबाबत आमच्यात चर्चा झाली, अशी माहिती ममदानी यांनी दिली.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.