AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलीत गेला पीस प्रस्ताव… या देशाने अमेरिकेला उडवून लावलं; वेडेपिसे झालेले ट्रम्प तणतणतच म्हणाले…

युकेनच्या अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट अमेरिकेच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. अमेरिकेने मोठा इशारा देत धमकी देखील यादरम्यान दिलीये.

चुलीत गेला पीस प्रस्ताव... या देशाने अमेरिकेला उडवून लावलं; वेडेपिसे झालेले ट्रम्प तणतणतच म्हणाले...
Donald Trump Ukraine Russia war
| Updated on: Nov 22, 2025 | 11:28 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय. जगावर एका मागून एक निर्णय थोपवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना हा पहिलाच इतका मोठा धक्का म्हणावा लागेल. स्वत: च्या तालावर जगाला नाचवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना कोणीतरी शेर मिळाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला. वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. युक्रेनच्या अध्यक्षांनी शनिवारी 22 नोव्हेंबर 2025 रोजी ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव नाकारला. फक्त नाकारलाच नाही तर थेट म्हटले की, मी माझ्या देशाशी विश्वासघात करू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच वोलोदिमिर झेलेन्स्की यांना जेलमध्ये पाठवण्याचे धमकी दिली आणि अमेरिका जी काही मदत करतंय ती करणार नाही, असे स्पष्ट सांगूनही वोलोदिमिर झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या विधानानंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना युक्रेनला मदत सुरू ठेवणे शक्य नाही. युक्रेन युद्ध लवकर संपवण्यासाठी रशियासोबत गुप्तपणे करार केला. ट्रम्प यांनी या शांतता कराराचा मसुदा झेलेन्स्की यांना पाठवला. मसुद्याच्या अटी उघड करण्यात आल्या नसल्या तरी, रशियाकडून गमावलेला डोनेस्तक प्रदेश युक्रेनला दिला जाईल असे मानले जाते. त्याला युक्रेनचा जोरदार विरोध आहे. हा प्रस्ताव रशियाला मान्य आहे.

रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली असून हा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे आणि युक्रेनने देखील मान्य केला तर नक्कीच युद्ध शांत होईल. डोनाल्ड ट्रम्पच्या शांतता योजनेत युक्रेनला त्यांच्या संविधानात अशी तरतूद समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती की ते कधीही नाटोचे सदस्यत्व मिळवणार नाहीत. मात्र, त्यालाही युक्रेनचा विरोध आहे. युक्रेनने आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी इशारा दिला की, अमेरिकेच्या प्रस्तावाचे परिणाम विचारात घेत असताना देश त्याच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक क्षणांपैकी एक आहे. कीवमधील एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय एकतेच्या गरजेवर भर दिला आणि मी कधीही युक्रेनियन लोकांशी विश्वासघात करणार नाही. युक्रेनसमोर एक कठीण पर्याय आहे. एकतर त्याची प्रतिष्ठा गमावणे किंवा महत्त्वाचा मित्र गमावण्याचा धोका आहे. योजनेतील किमान दोन मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री करण्यासाठी मी अहोरात्र काम करेल. युक्रेनियन लोकांचे प्रतिष्ठेचे आणि दुसरे, आपले स्वातंत्र्य.

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.