5 दिवसात टॅरिफवर होणार निर्णय, जगाच्या नजरा मलेशियाकडे, डोनाल्ड ट्रम्प विमानतळावर दाखल होताच…

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून जगाला धक्का देणारे निर्णय घेताना दिसत आहेत. आता सध्या डोनाल्ड ट्रम्प हे पाच दिवसांच्या आशिया दाैऱ्यावर आहेत. यादरम्यनचा त्यांचा मलेशियाच्या विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

5 दिवसात टॅरिफवर होणार निर्णय, जगाच्या नजरा मलेशियाकडे, डोनाल्ड ट्रम्प विमानतळावर दाखल होताच...
Donald Trump tariff
| Updated on: Oct 26, 2025 | 12:18 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच भरोसा नाही. फक्त एका जाहिरातीसाठी त्यांनी कॅनडावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावला. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पाच दिवसांच्या आशिया दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पोहोचले. यावेळी ती बिनधास्त मूडमध्ये दिसले. चीनवरील दबाव वाढवण्यासाठी त्यांचा हा दाैरा असल्याचे स्पष्ट आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आशियाच्या दाैऱ्यावर आहेत. हेच नाही तर क्वालालंपूर विमानतळावर उतरल्यानंतर ते चक्क स्थानिक कलाकारांसोबत ठेका धरून डान्स करताना दिसले. 23 तासांचा प्रवास करून ते मलेशियाला पोहोचले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाच दिवसांचा आशिया दौरा असून अमेरिकेचे स्थान आणि व्यापार संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आसियान शिखर परिषदेसाठी मलेशियात आहेत. जपानचे पंतप्रधान देखील या शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील सहभागी होणार असून ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात देखील बैठक पार पडणार आहे.

ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात व्यापार चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय घेतला. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावणार आहे. दुर्मिळ खनिजांवर चीनने निर्बंध लादल्याने आपण हा टॅरिफ लावत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, चीन देखील अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरला असून थेट कारवाई करण्याची तयारी केलीये.

दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद आहेत. असा व्यवहार अमेरिका चीनसोबत करू शकत नाही, असे स्पष्टपणे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशातील व्यापार तणाव हा अधिकच वाढताना दिसत आहे. जर चीन आणि अमेरिकेतील व्यापार तणाव अधिक वाढला तर याचा फटका फक्त दोन्ही देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला बसण्याचेही दाट संकेत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.