मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले… थेट इस्रायलला सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Trump angry on Israel : इस्रायलने बेरूतमधील दाहिया भागावर हल्ला केला. त्यानंतर ईराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ले केले. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं, नेमकं काय म्हणाले?
Donald Trump angry on Israel
Image Credit source: Google
| Updated on: Jun 14, 2026 | 10:41 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराची चर्चा सुरू असताना इस्रायलने बेरूतमधील दाहिया भागावर हल्ला केला. त्यानंतर ईराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ले केले. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला होऊ नये होता, असे म्हटले असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि तणाव आणखी वाढवू नये, असे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर म्हटले, ‘इराणसोबत शांतता चर्चा सुरू असताना आज सकाळी बेरूतवर झालेला हल्ला व्हायला नको होता.’

काय म्हणाले ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेसाठी धोके रोखण्याचा अधिकार आहे. मात्र, ज्याला उत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला तो हल्ला अत्यंत किरकोळ आणि निष्प्रभ होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झाले नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या शांतता प्रक्रियेला धक्का बसू नये. आपण अशा कराराच्या जवळ आहोत जो लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात शांतता आणू शकतो. त्यामुळे सर्व पक्षांनी एक पाऊल मागे घ्यायला हवे. इस्रायलने लेबनॉनमध्ये आणखी हल्ले करू नयेत. तसेच हिजबुल्लाह किंवा इतर कोणत्याही गटाने इस्रायलवर हल्ला करू नये. ही दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण शांततेची सुरुवात ठरू शकते. ती वाया जाऊ देऊ नका.’

अमेरिका-ईराण करारामुळे इस्रायल नाराज?

एका अहवालानुसार, अमेरिका आणि ईराण यांच्यात सध्या ज्या स्वरूपाचा करार तयार होत आहे, तो इस्रायली सरकारसाठी निराशाजनक मानला जात आहे. कारण पाकिस्तान आणि इतर देशांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत इस्रायलला दुय्यम स्थान मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. ईराण आणि इस्रायलमधील तणाव आधीच वाढलेला होता. युद्धविरामानंतर इस्रायलने बेरूतच्या उपनगरावर हल्ला केला होता. त्यामुळे आता पुन्हा झालेल्या या हल्ल्यांमुळे संघर्ष पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत ईराणसोबत करार करण्याच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे.

इस्रायलने हल्ला का केला?

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाहकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली. हिजबुल्लाहने तीन प्रोजेक्टाइल डागले होते. इस्रायली सैन्याने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये जोरदार स्फोटानंतर धुराचे लोट उठताना दिसत होते. मात्र, ईराण समर्थित हिजबुल्लाहने या घटनेवर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Follow Us