संपूर्ण जग धोक्यात? कोणालाही न सांगता चीनकडून राबवलं जातेय सिक्रेट मिशन?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ चीन महत्त्वाची मोहीम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

संपूर्ण जग धोक्यात? कोणालाही न सांगता चीनकडून राबवलं जातेय सिक्रेट मिशन?
xi jinping and china
| Updated on: Jul 17, 2025 | 3:57 PM

चीन नेहमीच विस्तारवादाच्या भूमिकेत राहिलेला आहे. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी या देशाने कायमच आपल्या सैन्याला बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही या देशाचा सरकार वेगवेगळी संहारक शस्त्र बनवण्याचा कार्यक्रम चालू असतो. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार चीन एका सरोवराशेजारी अण्वस्त्र निर्मितीचं सिक्रेट मिशन राबवत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या या ठिकाणाचे नाव लोप नूर असे आहे. हा प्रदेश चीनमध्ये असून तिथे एक सरोवर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागात चीन शस्त्रनिर्मिती करतो. हा प्रदेश भारतापासून साधारण 1500 किलोमीटर आहे. हा प्रदेश अफगाणिस्तानच्या सीमेजवळही असल्याचे सांगितले जाते. हाच धागा पकडून मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवर असेलेले अमेरिकेचे सैनिक कधीच परत बोलवले नसते. हा एअरबेस कधीच रिकामा केला नसता, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्य?

ट्रम्प यांनी बगराम एअरबेस आणि लोप नूर ही दोन ठिकाणं अवघ्या एका तासाच्या अंतरावर असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षपणे या दोन्ही ठिकाणांमधील अंतर 2000 किलोमीटर आहे. त्यामुळे रस्त्याने एका तासाचा प्रवास करून लोप नूरजवळ पोहोचणे शक्य नाही. लष्कराच्या सुपरफास्ट विमानांच्या मदतीने मात्र ते शक्य होऊ शकते.

हे ठिकाण म्हणजे चीनसाठी लष्करी तळ

दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांबाबत काही प्रमाणात साशंकता व्यक्त केली जात असली तरी नागासाकि अॅटोमिक इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार चीनजवळ साधारण 600 अण्वस्त्रं आहेत. तसेच लोप नूरमध्ये या अण्वस्त्रांचा विस्तार वेगाने करण्यात येत आहे. हे ठिकाण एका सरोवराजवळ आहे. लोप नूर हे चीनसाठी शस्त्रांचे परीक्षण करण्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. हेच ठिकाण भारतापासून फक्त 1500 किलोमीटर अंतरावर आहे.  आतापर्यंत या ठिकाणाहून चीनने अनेक शस्त्रांचे परीक्षण केलेले आहे.