पूर्णपणे पागल झाले आहेत.. डोनाल्ड ट्रम्प भडकले, थेट धक्कादायक निर्णय घेत..
इराण आणि अमेरिका युद्धाला उद्या तीन महिने पूर्ण होतील. त्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच भडका फडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे टीका केली. हेच नाही त्यांनी पागलच म्हणून टाकले आहे. युद्धविराम करार लवकरच होईल, असे सांगितले जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली. यावेळी ते इतर कोणत्या देशावर नाही तर थेट युद्धाच्या वार्तांकनावरून प्रसारमाध्यमांवर भडकले. हेच नाही तर त्यांनी पक्षापाताचा आरोपही केला. इराणची शरणागती एक विजय म्हणून दाखवले जात असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, जर इराणने शरणागती पत्करली तर त्यांचे नाैदल समुद्राच्या खोल तशाळी गेले. त्यांचे हवाई दल आताही आपल्यासोबत नाहीये. जर त्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि म्हटले, आम्ही शरण येतो.. आम्ही शरण येतो.. असे ओरडत तेहरानमधून बाहेर पडले. त्यांच्या प्रतिनिधींनी पांढरा झेंडा फडकवला. बाकी त्यांच्या उरल्या सुरल्या नेतृत्वाने शरणागतीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
जर इराणने अमेरिकेच्या महाशक्ती आणि सामर्थ्यासमोर आपला पराभव मान्य केला. तरीही न्यूयॉर्क टाइम्स, चायना स्ट्रीट जर्नल, भ्रष्ट आणि आता अप्रासंगिक झालेले सीएनएन आणि बाकीच्या सर्व खोट्या बातम्या देणाऱ्या माध्यमांनी इराणने अमेरिकेवर एक उत्कृष्ट आणि मोठा विजय मिळवला अशी ठळक बातमी दिली असती. त्यांनी पुढे लिहिले की, डेमोक्रॅट्स आणि प्रसारमाध्यमे पूर्णपणे भरकटले आहेत. ते पूर्णपणे पागल झाली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकला काढला आहे. यापूर्वीही त्यांनी इराण आणि अमेरिका युद्धाच्या बातम्यांबाबत अशाचप्रकारची नाराजी जाहीर केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांवर निशाणा साधल्याचे बघायला मिळत आहे. इराणसोबतच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर माध्यमातून सातत्याने टीका केली जात आहे.
US President Donald Trump posts on Truth Social, “If Iran surrenders, admits their Navy is gone and resting at the bottom of the sea, and their Air Force is no longer with us, and if their entire Military walks out of Tehran, weapons dropped and hands held high, each shouting “I… pic.twitter.com/LC9mATlYSG
— Press Trust of India (@PTI_News) May 27, 2026
याच टीकेवर डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. त्यांनी माध्यमांविरोधात पार भली मोठी पोस्ट टाकली आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला उद्या तीन महिना पूर्ण होईल. इराण अमेरिका युद्ध फार तर फार चार आठवडे चालण्याचा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. मात्र, आता तीन महिने होऊनही युद्ध काही थांबत नाहीये. ऊर्जेचे मोठे संकट या युद्धामुळे निर्माण झाले.