डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली गुड न्यूज, पासपोर्ट-व्हिसाबाबत घेतला क्रांतिकारी निर्णय

India USA Relation : अमेरिकन सरकारने भारतीय नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता भारतीय नागरिकांना पासपोर्ट, व्हिसा आणि ओसीआयसह विविध कॉन्सुलर सेवांसाठी वाट पाहण्याची गरज नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली गुड न्यूज, पासपोर्ट-व्हिसाबाबत घेतला क्रांतिकारी निर्णय
India USA Passport
Image Credit source: Google
| Updated on: Dec 17, 2025 | 7:12 PM

गेल्या काही काळापासून अमेरिकन सरकारने व्हिसाबाबत अनेक निर्णय घेतलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अनेक देशातील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र आता अमेरिकन सरकारने भारतीय नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता भारतीय नागरिकांना पासपोर्ट, व्हिसा आणि ओसीआयसह विविध कॉन्सुलर सेवांसाठी वाट पाहण्याची गरज नाही. लॉस एंजेलिसमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने अमेरिकन सरकारच्या मदतीने एक नवीन भारतीय वाणिज्य दूतावास अर्ज केंद्र (ICS) उघडले आहे. यामुळे हजारो भारतीय नागरिकांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवीन भारतीय वाणिज्य दूतावास अर्ज केंद्र 15 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले आहे. हे केंद्र व्हीएफएस ग्लोबलद्वारे चालवले जात आहे. यामुळे दक्षिण कॅलिफोर्निया आणि आस्पा प्रदेशात राहणाऱ्या लाखो भारतीयांना फायदा होणार आहे. हे केंद्र लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमध्ये, 800 एस फिग्युरोआ स्ट्रीट, सुइट 1210, सीए 90017 येथे उघडले आहे. हे केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. काही सेवा शनिवारी देखील उपलब्ध राहणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्या सेवा मिळणार?

लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमध्ये असणारे हे नवीन केंद्र भारतीय डायस्पोरासाठी सर्व आवश्यक कॉन्सुलर सेवा प्रदान करणार आहे. या सेवांसाठी लोकांना आता वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही. यात खालील सेवांचा समावेश असणार आहे.

  • भारतीय पासपोर्टशी संबंधित सेवा
  • व्हिसा अर्ज
  • ओसीआय कार्ड
  • भारतीय नागरिकत्व सोडण्याची प्रक्रिया
  • ग्लोबल एंट्री प्रोग्राम (जीईपी)
  • कागदपत्र अटिस्टेड आणि इतर सेवा

भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

भारतीय वाणिज्य दूतावास अर्ज केंद्र सुरू झाल्याची माहिती सीजीआय लॉस एंजेलिसने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सीजीआयने म्हटले की, हे केंद्र भारतीय डायस्पोराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन उघडण्यात आले आहे. यामुळे केवळ प्रक्रिया सुलभ होणार नाही तर वेळेची देखील बचत होणार आहे. हे केंद्र लॉस एंजेलिस आणि आसपासच्या राज्यांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक-स्टॉप उपाय म्हणून काम करणार आहे. यामुळे या भागातील भारतीयांना मोठा फायदा होणार आहे.