AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत रशियाचे कपडे धुण्याचे मशीन, डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर अत्यंत खालच्या पातळीची टीका, म्हणाले, नफेखोरीत…

आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट भारतावर टीका करण्यात आली आहे. या टीकेनंतर लोकांमध्ये मोठा संताप हा अमेरिकेबद्दल बघायला मिळतोय. अमेरिकेने भारतावर टीका करण्याची पातळी सोडल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

भारत रशियाचे कपडे धुण्याचे मशीन, डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर अत्यंत खालच्या पातळीची टीका, म्हणाले, नफेखोरीत...
Donald Trump
| Updated on: Aug 22, 2025 | 1:07 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी भारताबद्दल बोलण्याची पातळी सोडल्याचे स्पष्ट दिसंतय. भारताला चक्क रशियाचे कपडे धुण्याचे मशीन म्हटले आहे. टॅरिफ 50 टक्के लागू होणार असून याला फक्त सहाच दिवस बाकी असल्याची धमकीही त्यांनी दिलीये. पीटरने म्हटले की, हा अत्यंत फालतू मुद्दा आहे की, भारताला रशियाच्या तेलाची गरज आहे. नवी दिल्ली रिफायनरीतून नफा कमावत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय.

पीटरने पुढे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेतावणीनंतरही भारत ऐकायला तयार नसल्याने आता त्यांच्यावर 27 ऑगस्टपासून टॅरिफ 50 टक्के लावला जाणार आहे. भारताकडून जिनपिंगसोबत जवळीकता वाढवली जात आहे. भारत कमी किंमतीत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्याला रिफाईन करून जगभरात विकतो. एकप्रकारे कपडे धुण्याच्या मशिनसारखे काम करतो आणि मोठा पैसा कमावतो. भारतीय हे रिफायनरी युद्धाला हवा देत असून त्यामधून पैसा कमावत आहेत.

त्यांना तेलाची गरज नाही त्यांना रिफायनर करून नफेखोरी करायची आहे. भारत आम्हाला त्यांच्या वस्तू विकून पैसा कमावतो आणि त्याच पैशातून तेल खरेदी करतो. पण रशिया तेलाच्या पैशातून युक्रेनच्या युद्धासाठी पैसा लावत आहे आणि त्यातून युक्रेनच्या नागरिकांचे जीव जात आहे. हेच नाही पीटरने पुढे म्हटले की, भारत हा टॅरिफचा महाराजा आहे. आम्ही त्यांच्यासोबत करत असलेल्या व्यापारात आमचा फायदा नाहीये. त्यामध्ये अमेरिकी कामगार आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते.

भारत आम्हाला त्यांच्या वस्तू विकतो आणि आलेल्या पैशातून रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यानंतर त्या तेलावर प्रोसेस करून भाव वाढून विकले जाते. पीटर नवारो यांनी केलेल्या विधानानंतर आता भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. फक्त पीटर नवारोच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सरकारकडून भारताबद्दल अशी धक्कादायक विधाना सातत्याने केली जात आहेत. भारताविरोधात अमेरिकेकडून पुन्हा एकदा आग ओकण्यात आल्याचे बघायला मिळतंय. दुसरीकडे अमेरिकी कंपन्या या मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत पैसा कमावत आहेत.

Follow Us
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले