टॅरिफच्या तणावात भारतीयांना मोठा सल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशाराच, पुढे…
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेलेले आहेत. यादरम्यान अनेक देशांनी भारतासोबतची जवळीकता वाढवल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर थेट मोठे व्यापार करार देखील केली आहेत. हा अमेरिकाला मोठा झटका आहे.

भारत अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावरून संबंध ताणले गेलेले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. आता भारतीय लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेऊ नका असे सांगण्यात आलंय. फक्त हेच नाही तर ट्रम्प हे राष्ट्रध्यक्षपदासाठी योग्य नसल्याचेही सांगण्यात आलंय. टॅरिफच्या वादात माजी NSA जॉन बोल्टन यांनी मोठे विधान केले. त्यांनी एक मुलाखत दिली. बोल्टन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे काहीही निर्णय घेतात, हे विचार कोणत्याही पार्टीचे असू शकत नाहीत. माझे ,स्पष्ट मत आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती अजिबातच नाहीत.
मुळात म्हणजे ट्रम्प सरकारचे निर्णय समजण्यापलीकडील आहे. ते दिल्लीवर रशियाचे तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकतात तर दुसरीकडे बीजिंगला मोकळे सोडतात. अमेरिकेचे राष्टध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे व्यक्ती अजिबातच योग्य नाहीत त्यांच्यामुळे भारतासोबतचे संबंध वाईट स्थितीत आहेत. सर्वात गंभीर गोष्ट पुढे आले जी भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होती, त्यावेळीच त्यांनी टॅरिफचा निर्णय घेतला. तो निर्णय कोणताही विचार न करता अचानक घेण्यात आला.
भारतावर टॅरिफ लावला, रशिया किंवा चीनवर नाही. म्हणजे ही रणनीती समजण्यासारखी नाहीच. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतासोबतचे नात खराब होत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतासोबतच इतर देशांचाही अमेरिकेवरील विश्वास उडला आहे. ही दुर्देवाची गोष्ट आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरून भारतासोबतच इतर देशांसोबत नाते खराब केले. आता या गोष्टी चांगल्या करण्यासाठी खूप मोठा वेळ लागणार आहे. अमेरिकन लोकांनाही डोनाल्ड ट्रम्प यांची ही रणनीती अजिबातच पटलेली नाहीये. मुळाच म्हणजे टॅरिफच्या मुद्द्याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संबंध चांगले होते, आता नाहीत.
योग्यवेळी नरेंद्र मोदी यावर नक्कीच भाष्य करतील. भारताचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर तर चीनचे परराष्ट्र मंत्री हे भारताच्या दाैऱ्यावर आणि पुतिन हे देखील पुढच्या महिन्यात भारत दाैऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. हा थेट मोठा संदेश भारताचा वॉशिंग्टनला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर भारतीय लोकांमध्ये अमेरिकेबद्दल अविश्वासाची भावना तयार झाली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही वर्षात अमेरिकेबद्दल भारतीय लोकांमध्ये मित्राची भावना होती, जी आता संपलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी झटक्यात भारतीय लोकांच्या मनातील भावना बदलली आहे.
