AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर गंभीर आरोप, जग हादरलं, भारतामुळेच हे…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. त्यामध्ये आता परत वेगळाच आरोप करण्यात आला आहे. शिवाय त्यांनी टॅरिफच्या मुद्दयावरून परत एकदा धमकी दिली असून भारताला यामध्ये कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर गंभीर आरोप, जग हादरलं, भारतामुळेच हे...
| Updated on: Aug 22, 2025 | 7:38 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावणाचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, आता परत एकदा अमेरिकेकडून धमकी दिली असून काही गंभीर आरोपही लावली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच कारणीभूत आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच हे युद्ध जास्त काळ सुरू आहे.

हेच नाही तर भारताला टॅरिफवर कोणत्याही प्रकारची सुट देण्यात येणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी प्रेसमध्ये म्हटले की, शांतीचा रस्ता हा भारताहून जातो. मी भारतावर खूप प्रेम करतो. नक्कीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत. मात्र, भारताला हे समजले पाहिजे की, त्यांच्यामुळे काय होतंय. मुळात म्हणजे असे आहे की, हे युद्ध थांबवले पाहिजे तर त्याला प्रोत्साहन दिल्यासारखे होतंय. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि रिफाइन करतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जातो.

रशियाला ते मोठ्या प्रमाणात या बदल्यात पैसा देतात आणि रशियाकडून याच पैशातून हत्यार युद्धासाठी खरेदी केली जातात. याच्या माध्यमातून युक्रेनच्या नागरिकांचा जीव घेतला जातो. मात्र, नवारो यांचे बोलणे अमेरिकी मीडियाला देखील पटले नाही. त्यांनी लगेचच चीनसोबतच्या तेल खरेदीवर प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे. काहीही झाले तरीही अमेरिकेला भारतालाच दोषी ठरवायचे असल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाब टाकला जात आहे.

सातत्याने अमेरिकेकडून भारतावर टॅरिफच्या मुद्द्यावरून आरोप केली जात आहेत. त्यामध्येच आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला त्यांनी भारताला कारणीभूत ठरवले आहे. अमेरिकेला काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत भारताने अजून काही महत्वाचे करार अमेरिकेसोबत केली आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?