AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा दणका! ‘मला याबाबत माहित नाही, चौकशी करेन…’भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट बदलली भाषा

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भारत रशियाकडे कच्चे तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प नाराज आहेत.

भारताचा दणका! 'मला याबाबत माहित नाही, चौकशी करेन...'भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट बदलली भाषा
| Updated on: Aug 06, 2025 | 7:52 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भारत रशियाकडे कच्चे तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प नाराज आहेत. आता थेट भारतानेच ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबतची माहिती घेणार असल्याचे म्हटले.

अमेरिका आणि युरोपने रशियाकडून तेल आयात करत असल्याने भारताला टार्गेट केले आहे, पण अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड, पॅलेडियम, फर्टिलाइजर्स आणि रसायने आयात करत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला याबाबत माहिती नाहीये, मी चाैकशी करतो. मुळात म्हणजे विदेश मंत्रालयाने मंगळवारी म्हटले होते की, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

हेच नाही तर ज्यावेळी हे युद्ध सुरू होते त्यावेळी अमेरिकेनेच भारताला हे तेल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एकप्रकारे ट्रम्प यांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. अमेरिका आपल्या अणुउद्योगासाठी रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड आयात करते.  मग भारत जर रशियाकडून कच्चे तेल स्वस्त दरात खरेदी करत असेल तर अमेरिकाला का पोटदुखी असावी, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून भारत कच्चे तेल विकत घेते, यावर भाष्य केले होते. हेच नाही तर त्यांची म्हणणे आहे की, भारत अमेरिकेला अनेक गोष्टी विकतो. पण अमेरिकेकडून काही खरेदी करत नाही. भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लादला जातो. भारतावर अमेरिकेकडून जास्त कर लावण्यासाठी पाऊसे उचलली जात आहेत. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय भाष्य करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर जास्त कर लावण्याबद्दल भाष्य करताना दिसत आहेत.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच