
पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. यामध्ये अनेक पर्यटकांना आपले जीव गमावावी लागली. हेच नाही तर कुटुंबियांसमोर थेट गोळ्या दहशतवाद्यांनी घातल्या. या धक्कादायक घटनेचे अनेक व्हिडीओ देखील पुढे आली. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले आणि त्यांचे कंबरडे मोडले. पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटमधून महत्वाचा भाग हा दहशतवाद्यांना देतो हे जगजाहीर आहे. आता जागतिक समुदाय पाकिस्तानच्या डावपेचांवर लक्ष ठेऊन आहे. आता ट्रम्प प्रशासनाच्या अमेरिकन परराष्ट्र विभागाने पाकिस्तानला त्यांचे संरक्षण आणि गुप्तचर बजेट संसदीय किंवा नागरी सरकारच्या देखरेखीखाली ठेवण्याचे थेट निर्देश दिले आहेत. यामुळे आता पाकिस्तानला मोठा फटका बसला असून त्यांचा बुरखा फाडला जाणार हे स्पष्ट आहे.
पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटमधून मोठा हिस्सा थेट दहशतवाद्यांना देतो आणि त्यामुळे त्यांना मोठे बळ भारताविरोधात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मिळते. हेच आता अमेरिकेने रोखणाचा निर्णय घेतलाय. वृत्तानुसार, वॉशिंग्टनने आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी इस्लामाबादला थेट अशाप्रकारे निर्णय घेण्यास सांगितले. यानुसार, आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 2025 च्या आर्थिक पारदर्शकता अहवालात समाविष्ट आहेत.
पाकिस्तानसमोर मोठी समस्या उभी असून दहशतवाद्यांना नेमका पैसा द्यायचा तरी कसा? अमेरिकन सरकारचे हे वार्षिक मूल्यांकन विविध सरकारांच्या अर्थसंकल्पीय आढावा घेते, सार्वजनिक पैशाचे व्यवस्थापन, प्रकाशन, लेखापरीक्षण आणि खर्च कसे करतात यावर लक्ष केंद्रित करते. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानमधील काही मंत्री देखील तणावात असल्याचे बोलले जात आहे. कारण पाकिस्तानच्या बजेटमधून लष्करापेक्षाही मोठा हिस्सा दहशतवाद्यांसाठी काढला जातो.
पाकिस्तानमधील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या बजेटवर संसदीय किंवा नागरी सार्वजनिक देखरेख नव्हती, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने पाकिस्तानला चांगलाच मोठा झटका दिला आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता साधलीये. भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे अमेरिकेचे दाैरे हे अधिक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.