AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, थेट म्हणाले, गंभीर परिणामांना…

टॅरिफच्या मुद्दावरून वाद वाढलेला असतानाच आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिली आहे. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हे अमेरिकेकडून लादण्यात आलंय. भारत याला विरोध करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट धमकी दिली आहे.

टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, थेट म्हणाले, गंभीर परिणामांना...
Donald Trump
| Updated on: Aug 14, 2025 | 10:29 AM
Share

अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलाय. भारत अजून अमेरिकेच्या पुढे झुकला नाहीये. भारत आपल्या भूमिकेवर कायम आहे आणि अटी देखील मान्य केल्या नाहीत. मात्र, अमेरिकेकडून भारतावर वेगवगेळ्या पद्धतीने दबाव टाकला जातोय. हेच नाही तर अमेरिकेच्या भूमीवरून पाकिस्तानने भारताला हल्ल्याची धमकी दिली. भारत आणि अमेरिकेमधील तणाल वाढत असतानाच अनेक देशांनी भारताची साथ दिली असून अमेरिकेच्या अटी मान्य करू नये, असा सल्ला दिला आहे.

भारतावर अमेरिकेकडून टॅरिफ लादण्यात आल्यानंतर पुतिन यांनी लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. काहीवेळ दोघांमध्ये फोनवर संभाषण झाले. रशिया भारताच्या पाठिशी आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो, हीच मोठी समस्या डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट रोजी भेट होणार आहे. त्यापूर्वीच अमेरिकेकडून पुतिन यांना मोठा धमकी देण्यात आलीये.

या भेटीचे दोन मुख्य कारण आहेत. एक म्हणजे युक्रेनसोबत रशियाचे सुरू असलेले युद्ध आणि दुसरे भारतावरील टॅरिफ  भेटीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे रशियाला टार्गेट करत असतानाच काल रशियाकडून देखील आपली ताकद अमेरिकेला दाखवण्यात आली. आता भेटीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे धमकी देताना दिसत आहेत. यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,  जर पुतिन यांनी या बैठकीत युद्धबंदीवर सहमती दर्शविली नाही तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

रशियन राष्ट्राध्यक्षांसोबत दुसऱ्या बैठकीची चांगली शक्यता आहे, ज्यामध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की देखील सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. झेलेन्स्की यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर संवाद साधला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्दावरून भारताच्याविरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात मोदी हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होईल. भारत टॅरिफला विरोध करत आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?