AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, ‘या’ दोन देशाच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान मोदींना फोन, अमेरिकेला धक्का देण्यासाठी मास्टर..

भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफमुळे ताणले गेले आहेत. अमेरिकेने भारतासोबतच ब्राझीलवर देखील टॅरिफ लादलाय. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत अमेरिकेच्या विरोधात काय कारवाई करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, 'या' दोन देशाच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान मोदींना फोन, अमेरिकेला धक्का देण्यासाठी मास्टर..
donald trump and pm narendra modi
| Updated on: Aug 13, 2025 | 5:20 PM
Share

अमेरिकेने काही देशांवर टॅरिफ लादला आहे. हेच नाही तर दबाव टाकून टॅरिफच्या अटी मान्य करून घेण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प याचं सुरू आहे. आता काही देश टॅरिफच्या विरोधात अमेरिकेच्या विरूद्ध एकत्र येताना दिसत आहेत. भारताकडून अनेकांना आशा आहे, कारण अमेरिका एका मागून एक करून सर्वांवर टॅरिफच्या माध्यमातून अन्याय करत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचे राष्ट्रपती यांच्यासोबतच इतर काही देशाच्या अध्यक्षांचे फोन आले असून यामध्ये महत्वाची चर्चा झाली.

ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डा सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. अमेरिकेने भारतावर टॅरिफ आकारल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्येही फोनवरून संवाद झाला. आता 15 ऑगस्टला पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक आहे. भारताप्रमाणेच अमेरिकेने ब्राझीलवर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ब्राझीलला भारताकडून अपेक्षा आहे की, भारत यामधून काहीतरी मार्ग काढले आणि ट्रम्पची दादागिरी संपवेल.

ब्राझील आणि भारत हे दोन्ही देश ब्रिक्सचे संस्थापक सदस्य आहेत. यामुळे ब्राझीलच्या अपेक्षा भारतावर कायम आहेत. जगातील चाैथ्या नंबरची इकोनॉमी भारत असल्याने भारत काहीतरी पाऊले डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात उचलेल अशी अपेक्षा ब्राझीलसह इतर काही देशांना आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात भारताने कायमच शांततेचा शांततेचा संदेश दिलाय. भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत. यादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेलेंस्कीचा फोन आला.

मुळात म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत अमेरिकेच्या अनेक मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आहेत. भारतातून कमावलेला पैसा हा अमेरिकेत जातो आणि तेथून अर्थव्यवस्थेला मदत होते. जर भारताने या कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली तर अमेरिकेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अशी देखील चर्चा आहे की, भारत हा अमेरिकेच्या विरोधात लवकरच ठोस भूमिका घेईल आणि या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून काही देशांना भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.