अत्यंत मोठी बातमी! भारताला घाबरले डोनाल्ड ट्रम्प, थेट बदलली भूमिका, ‘त्या’ वादावरून घेतला मोठा युटर्न
डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची भाषाच बदलली आहे. मोठा टॅरिफ भारतावर त्यांच्याकडून लावण्यात आलाय. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी अजून मान्य केल्या नाहीत. मात्र, टॅरिफसाठी भारतावर दबाव वाढला आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेतून भारताला परमाणु हल्ल्याची धमकी दिली. ज्यानंतर खळबळ उडाली. हेच नाही तर अमेरिकेवरही अनेकांनी टीका केली. आता यावर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली. त्यांचे म्हणणे आहे की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत असलेल्या संबंधामध्ये काहीच बदल झाला नाहीये. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाची प्रवक्ता टॅमी ब्रूस दोन्ही देशांबद्दल अमेरिकेची एकच भूमिका आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला वाद मिटवला, ज्यावेळी युद्धाची स्थिती होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर भाष्य केले.
पुढे बोलताना टॅमी ब्रूसने म्हटले की, आमचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत संबंध चांगले आहेत आणि पुढच्या काळातही राहतील आणि त्यामध्ये बदल होणार नाही. आता अमेरिका एक पाऊस मागे टाकताना दिसतंय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर हे दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेला पोहोचले आणि त्यांनी थेट अमेरिकेच्या धरतीहून भारताला परमाणु हल्ल्याची धमकी दिली. पहिल्यांदा असे घडले की, पाकिस्तानने अमेरिकेतून भारताला अशाप्रकारची धमकी दिली.
आसिम मुनीर यांनी दिलेल्या धमकीनंतर अमेरिकेतूनही टीका करण्यात आली. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने आसिम मुनीर यांच्या विधानानंतर स्पष्टीकरण दिलंय. अनेकांनी म्हटले की, आसिम मुनीर यांचे भाषण ऐकून ओसामा बिन लादेनची आठवण झाली. तो दखील अशाप्रकारे धमकी देत. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावलाय. 7 ऑगस्टपासून 25 टक्के आणि 27 ऑगस्टपासून 25 क्के टॅरिफ अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आला.
टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर निशाणा साधताना दिसले आहेत. अमेरिकेच्या भारताने अजूनही अमेरिकेच्या टॅरिफबद्दलच्या अटी मान्य केल्या नाहीत, या अटी मान्य करण्यासाठी अमेरिकेतून भारतावर दबाव टाकला जात आहे. टॅरिफमुळे होणारे नुकसान कसे भरून काढायचे याच्यावर भारताकडून विचार चालू आहे. भारत देखील अमेरिकेच्या काही कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारी असल्याचे बोलले जाते. आता भारत काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
