ट्रम्प सरकारने परत ओकली भारताविरोधात आग, गंभीर आरोप, म्हणाले, भारत हा आमच्यासोबत…
टॅरिफच्या प्रश्नावरून भारत आणि अमेरिकेत संबंध ताणले गेले आहेत. यामध्येच अमेरिकेकडून सातत्याने भारताच्या विरोधात भाष्य केले जात आहे. इतर देशांपेक्षा जास्त टॅरिफ अमेरिकेने भारतावर लादले. ट्रम्प यांनी थेट म्हटले की, भारत हा सर्वाधिक टॅरिफ आकारणारा देश आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. भारतावर त्यांनी थेट 50 टक्के टॅरिफ लावलाय. हेच नाही तर जोपर्यंत यावर निर्णय होणार नाही तोपर्यंत व्यापार चर्चा नाही, असेही त्यांनी म्हटले. इतर देशांच्या तुलनेत भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यात आला. फक्त हेच नाही तर ट्रम्प भारताच्या विरोधात बोलत आहेत. अमेरिकेच्या भूमीवरून पाकिस्तानने भारताला धमकी दिलीये. मात्र, काहीही झाले तरीही भारत अमेरिकेच्या अटी मान्य करणार नसल्याची भूमिका सरकारची आहे. कारण या टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल.
आता परत एकदा अमेरिकेकडून भारतावर थेट मोठा आरोप करण्यात आलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी आरोप केलाय. स्कॉट बेझंट यांनी म्हटले की, भारत आमच्यासोबत ट्रेड डिलवर व्यवस्थित बोलत नाहीये. हेच नाही तर ट्रेड डिलवर त्यांची भूमिका बदलली आहे. पुढे ते म्हणाले की, म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत.
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार चर्चा सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याचे जाहिर केलंय. त्यापैकी अर्धा 25 टक्के 7 ऑगस्टपासून लागू करण्यात आला आहे आणि उर्वरित अर्धा 27 ऑगस्टपासून लागू करण्याचे ठरले आहे. एका मुलाखतीत बोलताना स्कॉट बेझंट यांनी म्हटले की, त्यांचे टार्गेट हे ऑक्टोंबर महिन्यापर्यंत मोठ्या व्यापाराशी हा करार पुर्ण होईल. आम्ही सर्व प्रमुख देशांसोबत यावर ठोस निर्णय घेऊ.
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार करारात भारताने थोडीशी शिथिल भूमिका घेतल्याचा आरोप स्कॉट बेझंट यांनी केला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणूनच हे पाऊल उचलले जात आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार चर्चा सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे, असे त्यांनी म्हटले. भारताच्या विरोधात अमेरिका भूमिका घेत आहे. भारताकडून प्रयत्न केली जात आहेत की, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफ कसा कमी केला जाईल आणि दुसरे पर्याय नेमके कोणते.
