इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. आता दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, इस्त्रायलच्या आक्रमक भूमिकेनंतर इराणकडून पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली.

इराण आणि अमेरिका युद्धाची झळ जगाला बसली. 2 आठवड्यांकरिता युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान युद्धबंदी करार पूर्ण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. युद्धबंदीची घोषणा दोन आठवड्यांकरिता करण्यात आल्यानंतरही इस्त्रायलकडून लेबनॉनवर मिसाईल हल्ले करण्यात आली. या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले, ज्यानंतर इराण संतापला. इराणकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडी बंद करण्यात आली. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद झाल्याने जग जैरीस आले. हेच नाही तर अगोदर इराणकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क होर्मुज खाडीत लावले जात नव्हते. आता इराण जहाजांकडून शुल्क वसूली करत आहे. अमेरिकेने या शुल्क वसुलीला विरोध केला. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पुन्हा एकदा जगात तेलाचा पुरवठा सुरळीत होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला. जगातील सुरळीत तेल पुरवठा लवकरच सुरू होईल.. मग तो इराणच्या मदतीने किंवा त्यांच्या मदतीशिवाय. मला काही फरक पडत नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर युद्धबंदी करार होतील किंवा नाही पण तेल पुरवठा सुरळीत होईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी करत असलेल्या देशांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. पण इराण काही अटींवर ठाम आहे. इराणला या करारांकरिता राजी करणे म्हणजे मोठे आव्हान झाले. अमेरिकेवर युद्ध थांबवण्याकरिता दबाव आहे. शेवटी त्यांनी या कामाकरिता पाकिस्तानला मदतीला घेतले.
पाकिस्तान या युद्धबंदी कराराकरिता मध्यस्थी करत आहे. होर्मुज खाडीत पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे. इराणच्या मदतीशिवाय आणि परवानगीशिवाय एकही जहाज होर्मुज खाडी पार करू शकणार नाही. इराणकडून पुन्हा होर्मुज खाडी अडवण्यात आली. अमेरिकेने होर्मुज खाडीवरील इराणचा ताबा काढण्याकरिता अनेक प्रयत्न केली पण त्यांना अजिबात यश मिळाले नाही.