
अमेरिकेने देशाला दाखवून दिले की, त्यांच्यावर विश्वास कोणीली ठेऊ शकत नाही. मागील काही वर्षापासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने सांगत आहेत की, नरेंद्र मोदी हे माझे खूप चांगले मित्र आहेत. शिवाय ते अनेकदा भारत दाैऱ्यावरही आले. मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर टॅरिफ लावला त्यानंतर सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात तब्बल 70 टक्के कमी होणार आहे. मोठ्या टॅरिफमुळे नफा कमी होणार आहे.
रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यानेच आपण त्यांच्यावर टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने म्हटले. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा अत्यंत मोठा दावा केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी एक चांगले व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलत होतो. मी त्यांना स्पष्ट विचारले की, तुमच्यामध्ये आणि पाकिस्तानमध्ये नेमके काय सुरू आहे? त्यावेळी खूप जास्त राग होता. हे मागील काही वर्षांपासून सुरू होते.
मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी तुमच्यासोबत कोणताही व्यापार करार करणार नाहीये. तुम्ही लोक थेट परमाणू युद्ध करू शकतात. मी त्यांना म्हटले की, तुम्ही मला उद्या परत फोन करा…पण मी तुमच्याशी कोणताही करार करणार नाही. मात्र, मी तुमच्यावर इतका जास्त टॅरिफ लावेल की, तुमचे डोके फिरेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पाच तासात करार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जे काही झाले ते फक्त पाच तासांमध्येच झाले.
मुळात म्हणजे अशा गोष्टी आम्हाला होऊ द्यायच्या नाहीत. मी टॅरिफची भीती दाखवून चार युद्ध रोखल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी म्हटले की, तुम्हाला युद्ध करायचे असेल आणि सर्वांना मारायचे असेल तर ठीक आहे…मी तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लावणार आहे. सर्वात मोठे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले असते असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, भारत सरकारकडून परत परत सांगण्यात येतंय की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात कोणत्याही हस्तक्षेप केला नसून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत युद्धाबाबत महत्वाचा निर्णय घेत युद्ध थांबवले.