
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफच्या निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून असे काही निर्णय घेत आहेत, ज्याच्या परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर होताना दिसतोय. भारत आणि ब्राझीलवर 50 टक्के कर लादल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक दुसरी कुरापत सुरू केलीये. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इतर देशांकडूनच नाही तर चक्क अमेरिकेतून देखील जोरदार टीका होताना दिसतंय.
टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा डाव
50 टक्के टॅरिफ कर अमेरिकेकडून लादण्यात आल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये असा धक्कादायक दावा करण्यात आला की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका गुप्त आदेशावर स्वाक्षरी केली, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेने परदेशातही लॅटिन अमेरिकन ड्रग कार्टेल्सवर लष्करी कारवाई केली जाऊ शकते. जे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी केल्या गुप्त आदेशावर सह्या
वृत्तानुसार, या निर्देशामुळे नौदल आणि इतर लष्करी तुकड्यांना परदेशी किनाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची परवानगी मिळते.यानंतर आता मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकन सैन्याला मेक्सिकोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही किंवा ते आमच्या जमिनीवर अशाप्रकारची कोणतीही कारवाई करणार नाहीत, त्यांना तशी परवानगी आम्ही देत नाहीत.
टॅरीफचा निर्णय घेतल्यावर ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी म्हटले की, आम्ही सहकार्य आणि समन्वय साधतो, मात्र कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप अजिबात होणार नाही किंवा आम्ही ते सहन करणार नाही.शेनबॉम यांनी स्पष्ट केले की कार्टेल्सविरुद्ध कोणतीही कारवाई दोन्ही देशांच्या परस्पर करारांनुसार केली जाईल, अमेरिकन सैन्याच्या माध्यमातून नाहीत. आता डोनाल्ड ट्रम्प पुढे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.