नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धरले वेठीस, काही तास शिल्लक असताना दबाव तंत्र, खळबळ…

डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांती पुरस्कारासाठी दावा करताना दिसले आहेत. आता काही तास शिल्लक असताना त्यांनी थयथयाट सुरू केला आहे. त्यांनी नोबेल पुरस्काराबद्दल अत्यंत मोठा दावा केला. त्यामध्येच काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या.

नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धरले वेठीस, काही तास शिल्लक असताना दबाव तंत्र, खळबळ...
Donald Trump Nobel Prize
| Updated on: Oct 09, 2025 | 1:02 PM

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास अगोदरच इस्त्रायल-हमास युद्धाबंदीबाबत मोठी घोषणा केली. फक्त हेच नाही तर 20 कलमी प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली असून करारावर सह्या देखील केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. शनिवारी ओलिस ठेवलेल्या लोकांची सूटका केली जाईल. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हमासवर प्रस्ताव मान्य करण्यासाठी दबाव टाकताना दिसले. शेवटी इजिप्तमध्ये जावयाला पाठवून हमासकडून या करारावर सह्या करून घेतल्या. मात्र, त्यांच्या या सर्व पराकाष्ठा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी सुरू असल्याचे जगजाहीर आहे.

इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धबंदी प्रस्तावानंतर मोठे विधान करत डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करत म्हटले की, मला मनापासून वाटते की, रशिया-युक्रेन युद्ध देखील मी पुढील काही दिवसात थांबवेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हमास-इस्त्रायल युद्धबंदीच्या घोषणेनंतर व्हाईट हाऊस आणि रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नियंत्रणाखालील अधिकृत हँडल ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करणारे आणि शांतता अध्यक्ष म्हणून पोस्ट शेअर केली.

व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलवर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या कॉरिडॉरमधून चालत असतानाचा एक फोटो पोस्ट केलाय ज्याला कॅप्शन “द पीस प्रेसिडेंट” देण्यात आले. दुसरीकडे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये ट्रम्प ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणत फोटो शेअर केला. यासोबतच द पीस मेकर, असेही म्हटले. ज्यामध्येच ट्रम्प लाल टोपी घालून खुर्चीवर बसल्याचे दिसतंय.

नोबेल शांती पुरस्कारासाठी गाझा पट्टी शांत झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. मात्र, अद्याप कळू शकले नाही की, खरोखरच इस्त्रायल आणि हमास यांनी अटी मान्य केल्या का? पुढील काही दिवसात गाझा पट्टीतील परिस्थिती पुढे येईल, आताच त्या निकषावर डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळणे कठीण आहे. मात्र, अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हा पुरस्कार मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न शेवटच्या तासांमध्ये केली जात आहेत. एकप्रकारे दबाव टाकण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.