
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्याला मोठा धोका निर्माण झाला. इस्त्रायलकडून इराणच्या गॅस सुविधांवर मोठा हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणकडून थेट कतार आणि यूएईमधील रिफायनरीला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. यामुळे जगातील मोठं संकट ओढवलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. यासोबतच इस्त्रायल पुन्हा गॅस संबंधित सुविधांवर हल्ला करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर तेहरानने कतारच्या द्रवीकृत नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांवर आणखी हल्ले केले, तर वॉशिंग्टन दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर मोठा बॉम्बहल्ला करू शकतो, अशीही थेट धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे भविष्य खूप जास्त वाईट असेल असेही म्हटले आहे. कतारच्या एलएनजीवर पुन्हा हल्ला झाला नाही पाहिजे नाही तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जोपर्यंत इराण कतारवर पुन्हा हल्ला करत नाही, तोपर्यंत इस्रायल गॅस क्षेत्रावर कोणताही पुढील हल्ला करणार नाही. या अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान साउथ पार्स क्षेत्रावर इस्रायलकडून कोणताही पुढील हल्ला होणार नाही. थोडक्यात काय तर आता इस्त्रायकडून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर टार्गेट करून हल्ले केले जाणार नाहीत. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
मध्यपूर्वेत घडलेल्या घटनेमुळे इस्त्रायलकडून इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रातील मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची माहिती इस्त्रायलकडून वॉशिंग्टनला देण्यात आली नव्हती, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता इस्त्रायलचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कान पिळण्यात आली आहेत.
आता खरोखरच इस्त्रायल इराणच्या गॅस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणार नाही का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अगोदरच तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. त्यामध्येच आता थेट तेल प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जात असल्याने जग संकटात आलंय. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे.