AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प यांनी सांगितला असा किस्सा, प्रिन्स चार्ल्सही झाले अवाक्

Donald Trump Speech on Charles : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोलण्याची पद्धत विलक्षण आहे. ते केव्हा, कुठे आणि काय बोलतील याचा काही नेम नाही. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यास. मोर त्यांनी नुकतंच असं काही विधान केलं की, चार्ल्स लाजून लालबुंद झाले. असं काय म्हणाले ट्रम्प ?

व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प यांनी सांगितला असा किस्सा, प्रिन्स चार्ल्सही झाले अवाक्
डोनाल्ड ट्रम्प - प्रिन्स चार्ल्स
| Updated on: Apr 29, 2026 | 8:25 AM
Share

Donald Trump-King Charles: ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं व्हाईट हाऊसमध्ये मनापासून स्वागत केलं. मात्र त्यावेळी ट्र्म्प यांनी जे विधआन केलं त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल रंजकपणे बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाने नेहमीच ब्रिटिश राजघराण्याचा आदर केला आहे, पण एकेकाळी त्याच्या आईचं, प्रिन्स चार्ल्सवर क्रश (प्रेम) होता चार्ल्स जेव्हा तरूण होते, तेव्हा त्यांच्या (ट्रम्प) आईचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. मात्र ट्रम्प यांचं हे विधान ऐकून सगळेच अवाक् झाले आणि ज्यांच्याबद्दल हे बोलल जातं होत, ते चार्ल्स तर लाजून लालबुंद झाले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरे यांच्याबद्दल केलेल्या या विधानाने सगळीकडे खळबळ माजली. ट्रम्प यांनी खुलासा केला की त्यांच्या आईचं, चार्ल्सवर प्रेम होत. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले, राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या एका स्वागत समारंभात ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. राजा चार्ल्स (तृतीय), यांच्या पत्नी राणी कॅमिला आणि ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह अनेक वरिष्ठ अमेरिकी आणि ब्रिटिश अधिकारी व राजकारणी पाहुणे, यावेळी उपस्थित होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी चार्ल्स चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?

अमेरिकेत आलेल्या चार्ल्स यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केलं. “कोणत्याही समारंभात किंवा अशाच कोणत्याही प्रसंगी, माझी आई टीव्हीला खिळून बसायची आणि म्हणायची, ‘बघ डोनाल्ड, बघ किती सुंदर आहे,'” असे ट्रम्प म्हणाले. ” तिचं त्या कुटुंबावर खरंच खूप प्रेम होतं, पण मला हेही स्पष्ट आठवतंय की ती म्हणायची, “चार्ल्सकडे बघा, लहानग्या चार्ल्सकडे, तो किती गोंडस आहे.” ती माझी आई होती. माझ्या आईचं चार्ल्सवर प्रेम होतं. तुमचा विश्वास बसेल का?” असा किस्सा ट्रम्प यांनी सांगितला.

अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणार चार्ल्स

ब्रिटनचे राजा असलेले चार्ल्स(तृतीय) हे, अमेरिकन काँग्रेसला संबोधित करतील. ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या आई, राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी1991 साली अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भाषणात दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासावर आणि त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला होता. चार्ल्स यांच्या भाषणातही याच मुद्द्यांवर भर असण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट