Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील

दादागिरी करुन डोनाल्ड ट्रम्प यांनी 65 अब्ज बॅरल तेलावर मोठा हात मारला आहे. ही इतिहासातील सर्वात मोठी डील झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील
donald trump
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 8:24 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 ऑगस्ट रोजी व्हेनेझुएलासोबत इतिहासातील सर्वात मोठा तेलाचा करार केल्याची घोषणा केली. या करारामुळे अमेरिकेतली कच्च्या तेलाचा साठा चांगलाच वाढणार आहे. यामुळे पुरवठा चांगला होईल. त्याचबरोबर अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्यांच्या मदतीने व्हेनेझुएलामधील 65 अब्ज बॅरलहून अधिक तेलावर नियंत्रण मिळवलं आहे, असे डोनाल्ड टम्प यांनी घोषित केले.

करारासाठी करदात्यांचा एकही पैसे झाला नाही खर्च – डोनाल्ड ट्रम्प 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘माझ्या सांगण्यावरून परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, पीट हेगसेथ यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या सहकार्याने खासगी कंपन्यांसोबत भागीदारी केली. त्यानंतर अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरलपेक्षा अधिक तेलसाठ्यावर तेल नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. यासाठी अमेरिकेतील करदात्यांचा एकही पैसा खर्च झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

कराराचा कोणाला होणार फायदा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, नव्या करारामुळे अमेरिकेच्या ऊर्जा पुरवठ्याला चांगली चालना मिळाली असून तेल साठ्यात दुप्पट वाढ होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती कमी होण्यासही मदत मिळेल’. व्हेनेझुएलाने या कराराचे स्वागत केलं आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांनी या कराराचं स्वागत केलं. त्यांनी म्हटलं की, या करारामुळे आमच्या देशातील तिजोरीत चांगला महसूल जमा होईल. रोड्रिगेज यांनी पुढे म्हटलं की, व्हेनेझुएलामध्ये चांगली गुंतवणूक येईल. विशेष म्हणजे तेल उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास मदत मिळेल. तसेच त्याचं आधुनिकरण करण्यासही मदत मिळेल’.

नव्या करारामुळे व्हेनेझुएतील 17 तेल क्षेत्रांचा विकास होणार असल्याचा रोड्रिगेज यांचा दावा 

‘करारामुळे खासगी कंपन्यांच्या मदतीने तेल उत्पादनात वाढ होईल. तसेच 17 प्रमुख तेल क्षेत्रांचा विकास होण्यास मदत मिळेल. यात जवळपास 65 अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे. या प्रकल्पामुळे 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 209 डॉलर्स पेक्षा अधिक कर निर्माण होईल, अशी अपेक्षा रोड्रिगेज यांनी व्यक्त केली.

Follow Us