डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या खतरनाक प्लॅनमुळे जगभरात खळबळ, चीन आणि अमेरिका एकत्र येणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, चीनने अमेरिकेला सुरू असलेली रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता ट्रम्प आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या खतरनाक प्लॅनमुळे जगभरात खळबळ, चीन आणि अमेरिका एकत्र येणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 9:43 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, चीनने अमेरिकेला सुरू असलेली रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता, त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध चांगलेच ताणले गेले असून, जगात एक नवं व्यापार युद्ध सुरू झालं आहे. दरम्यान मात्र आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या आशिया दौऱ्यावेळी आपण चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग याच्यासोबत रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत चर्चा करणार आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनने रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आमची मदत करावी असं आम्हाला वाटतं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

एअर फोर्स वनमध्ये रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही रशियावर खूप कठोर निर्बंध लादले आहेत. ज्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी चीनने अमेरिकेची मदत करावी, असं आम्हाला वाटतं, आम्ही रशियावर खूप कडक निर्बंध घातले आहेत, मात्र यामध्ये अमेरिकेला चीनची साथ मिळाली तर हे युद्ध लवकर संपवू शकतं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे, पश्चिमेकडील देशांकडून रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील रशियानं युक्रेनसोबत आपलं युद्ध सुरूच ठेवलं आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडे मदत मागितली आहे.

डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात आशियाचा दौरा करणार आहेत, ते आपल्या या दौऱ्यामध्ये मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. याचदरम्यान ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे मोठं विधान केलं आहे.