अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी मोठी घोषणा, संपूर्ण जगाला आता…भारतासाठीही खुशखबर!
सध्या अमेरिका चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. चर्चेतून तोडगा न निघाल्यास मग मात्र पुन्हा एकदा हल्ले करता येतील. सध्या आम्ही इराणसोबत चर्चा करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

Donald Trump : सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. यावेळी हल्ले करताना अमेरिकेने चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. अमेरिकन सैन्य सध्या सज्ज आहेत. दरम्यान, एकीकडे संपूर्ण लष्कर अलर्ट मोडवर असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आणि जगाला चकित करून टाकणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात जगाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. याच निर्णयामुळे कदाचित भारतालाही भविष्यात दिलासा मिळू शकतो.
ट्रम्प इराणबाबत नेमकं काय म्हणाले?
गेल्या 13 दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चालू आहे. या संगर्षात अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत आहे. सध्या मात्र हे हल्ले अंशत: थांबवण्यात आले आहेत. 13 दिवसांमध्ये अमेरिकेने घेतलेला हा पहिला विराम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीच लष्कराला हल्ले थांबवण्याचा आदेश दिला आहे. आता हल्ले नव्हे तर चर्चेतून वाद मिटवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. कुटनीतीचा वापर करूनच हा संघर्ष मिटवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. सध्याच्या अमेरिकेच्या शस्त्रागारातील शस्त्रांचीही स्थिती लक्षात घेता ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या अमेरिका चर्चेतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असली तरीही त्यांनी आपले सैन्य तयार आणि सज्ज ठेवले आहे.
ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
सध्या अमेरिका चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. चर्चेतून तोडगा न निघाल्यास मग मात्र पुन्हा एकदा हल्ले करता येतील. सध्या आम्ही इराणसोबत चर्चा करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले आहेत. दुसरीकडे इराणवर सतत हल्ले केल्यामुळे अमेरिकेकडील दारुगोळा आणि शस्त्रंदेखील कमी होत आहेत. त्याबाबतही एक वेगळी चिंता आहे. म्हणूनही सध्या चर्चेतून मार्ग काढण्यावर अमेरिकेचा भर आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही बाब भारतासाठी खुशखबर ठरू शकते. चर्चेतून तोडगा निघाल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चे तेल कोणत्याही अडथळ्याविना भारतात येऊ शकते. त्यामुळे भारताची इंधन टंचाई संपू शकते. म्हणूनच आता भविष्यात नमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.