AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगासाठी आनंदाची बातमी ! BRICS सुरू असतानाच 2 मोठ्या बातम्या धडकल्या, यूरोपातून गुडन्यूज; तर पश्चिम आशियात…

नवी दिल्लीत ब्रिक्स परिषद सुरू असतानाच दोन महत्त्वाच्या जागतिक बातम्या धडकल्या. युरोपातून युक्रेन-रशिया युद्धसमाप्तीचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे शांततेची आशा पल्लवित झाली. मात्र, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊन जागतिक आर्थिक बाजारात खळबळ उडाली आहे, जो चिंतेचा विषय आहे.

जगासाठी आनंदाची बातमी ! BRICS सुरू असतानाच 2 मोठ्या बातम्या धडकल्या, यूरोपातून गुडन्यूज; तर पश्चिम आशियात...
zelensky Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 6:09 PM
Share

एकीकडे नवी दिल्लीत ब्रिक्स परिषद सुरू आहे. या परिषदेला जगभरातील बडे नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे यूरोप आणि पश्चिम आशियातून दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत. केवळ काही तासातच आलेल्या या दोन बातम्यांनी डिप्लोमॅटिक आणि आर्थिक बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यूरोपातील बातमीने तर दिलासा दिला आहे. यूक्रेने युद्धाबाबतचे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे यूक्रेन-रशिया युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मध्यपूर्वेतून आलेली बातमी टेन्शन देणारी आहे. कारण ब्रिक्सच्या मंचावरून तणाव दूर करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ग्लोबल मार्केटला मोठा झटका लागला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन दिल्लीत ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी आले असतानाच मोठी घटना घडली आहे. पुतिन येताच रशिया आणि यूक्रेनच्या दरम्यान गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट आला आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

डिसेंबरमध्ये चर्चा?

या दोन्ही नेत्यांमध्ये डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या G20 शिखर संमेलानाच्या दौऱ्या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. जर्मन मीडिया ‘डोइच वेले’ला दिलेल्या मुलाखतीत जेलेन्स्की यांनी हे संकेत दिले आहेत. जर तुम्हाला आणि पुतिन यांना G20 परिषदेला बोलावलं तर तुम्ही पुतिन यांची भेट घेणार का? यावर जेलेन्स्की यांनी होकारात्मक उत्तर दिलं. होय. निश्चितच. आम्हाला तिथे जायला पाहिजे. त्यांना भेटलं पाहिजे. चर्चा केली पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे, असं जेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं.

पोकळ भाषणांची वेळ गेली

केवळ पोकळ भाषणं आणि चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे. केवळ दोन शब्दांनी होणारी ही गोष्ट नाही. मी त्यांना काय म्हणतो आणि ते मला काय सांगू इच्छितात याने काही फरक पडत नाही. केवळ निष्कर्ष काय निघतो आणि निर्णय काय घेतला जातो, याने फरक पडतो. आता निर्णयाप्रत आलं पाहिजे, असंही जेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं. युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकन दूत स्टिव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांनी नुकताच मॉस्को आणि किवचा दौरा केला होता. जेलेन्स्की यांनी हा दौरा म्हणजे एक चांगला संकेत असल्याचं म्हटलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यात काही दिवसांपूर्वीच एक तास चर्चा झाली होती. दोन्ही नेत्यांनी फोनवरून एकमेकांशी संवाद साधला होता. ही चर्चा सकारात्मक असल्याचं क्रेमलिनने स्पष्ट केलं होतं.

पश्चिम आशियात तणाव

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची ब्रिक्स संमेलनात आले आहेत. ब्रिक्समध्ये हे दोन्ही नेते युद्ध समाप्त करण्याची चर्चा करत आहेत. अशातच पश्चिम आशियाला काळजीत टाकणारी एक बातमी येऊन धडकली आहे. सागरी क्षेत्रात पेटलेल्या ठिणगीने संपूर्ण जगाच्या तेल बाजाराला आग लावली आहे. गेल्या एक आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 8 टक्क्याहून अधिक झाली आहे. 4 सप्टेंबर रोजी क्रूड ऑईल 95 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास विकलं जात होतं. या आठवड्यात त्यात वाढवून 108 डॉलर प्रति बॅरलवर गेलं आहे. गेल्या चार महिन्यातील हा सर्वात उच्च स्तर आहे. पश्चिम आशियासाठी ही टेन्शन देणारी बातमी असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप