AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Free Beer : पोटभरून बिअर प्या, तेही मोफत; भन्नाट ऑफरची तुफान चर्चा; नेमकी अट काय?

सध्या एका ऑफरची जगभरात चर्चा होत आहे. एका बार मालकाने चक्क मोफत बिअर देण्याची एक ऑफर आणली आहे. पण ही ऑफर हवी असेल तर तुम्हाला अगोदर एक काम करावे लागणार आहे.

Free Beer : पोटभरून बिअर प्या, तेही मोफत; भन्नाट ऑफरची तुफान चर्चा; नेमकी अट काय?
donald trump and free beerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 2:55 PM
Share

Free Beer Offer : गेल्या काही वर्षात अनेक देशांत सत्ताबदल झाला. या सत्ताबदलामुळे त्या-त्या देशांतील सामाजिक, राजकीय स्थिती बरीच बदलली आहे. अमेरिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फस्ट’ या धोरणाचा पुरस्कार करतात. या धोरणाअंतर्गत ते नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मूळच्या अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी करणारे तसे स्थलांतरीतांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. ट्रम्प यांचे हेच धोरण आता तेथील समाजातही दिसू लागले आहे. त्याचीच प्रचिता आता आली असून एका बार मालकाने स्थलांतरीतांची माहिती देणाऱ्यांना तसेच स्थलांतरीतांना हद्दपार करणाऱ्यांना थेट मोफत बिअर देण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरची आता अमेरिकेसह इतर देशांतही चर्चा होत आहे.

नेमकी ऑफर काय आहे?

बऱ्याच दिवासांपासून अमेरिकेत स्थलांतरीतांविरोधात मोहीम राबवली जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तर या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. आता अमेरिकन प्रशासनासोबतच तेथील सामान्य लोकदेखील स्थलांतरीतांना अमेरिकेबाहेर पाठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आयडाहो राज्यातील ईगल शहरामधील एका बारमालकाने तर स्थलांतरीतांना देशाबाहेर काढण्यासाठी सामान्यांना खास ऑफर दिली आहे. स्थलांतरीत, अवैध पद्धतीने देशात घुसखोरी केलेल्यांची माहिती देणाऱ्यांना तसेच स्थलांतरीतांना देशाबाहेर काढणाऱ्यांना एक महिना मोफत बिअर देण्याची ऑफर दिली आहे. स्थलांतरीतांची माहिती देणाऱ्यांना पूर्ण एक महिना मोफत बिअर दिली जाणार आहे. बारमालकाची ही ऑफर सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. लोक या ऑफरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

बारचा मालक नेमका कोण आहे?

या बारमालकाचे नाव मार्क फिट्झपॅट्रिक असे आहे. ते डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. एलजीबीटीक्यू+ यांच्या प्राईड मंथला उत्तर म्हणून त्यांनी हेट्रोसेक्शुअल ऑसमनेस मंथ साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2024 साली त्यांनी त्यांच्या बारमध्ये हेट्रोसेक्शुअल लोकांसाठी मद्यप्राशन करण्यासाठी खास ऑफर दिली होती. आता त्यांनीच स्थलांतरीतांची माहिती देणऱ्यांना मोफत बिअर देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या ऑफरबाबत नेमकं काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान