डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दुहेरी झटका, झालं मोठं नुकसान, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी
मोठी बातमी समोर आली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दुहेरी झटका दिला आहे, भारताचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारताला आता मोठा फटका बसला आहे.

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला आहे. आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जात आहे. याचा मोठा फटका हा आता भारताच्या निर्यातीला बसला आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा झटका बसला आहे, मे ते ऑक्टोबर या काळात भारतामधून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. निर्यातीमध्ये जवळपास 28.5 टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तूंवर झिरो टॅरिफ आहे, अशा वस्तूंच्या निर्यातीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. ज्या वस्तूंवर झिरो टॅरिफ आहे, अशा वस्तूंच्या निर्यातीमध्ये देखील 25.8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे आता थिंक टँक जीटीआरआयकडून निर्यात प्रोत्साहन वाढवण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. निर्यातीसाठी अनुकूल वातावरण तयार करावे, तसेच अमेरिका भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवेल यासाठी वातावरण निर्मिती करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या टॅरिफचा भारताला दुहेरी फटका बसला आहे, एक तर भारतावर इतर देशांपेक्षा जास्त टॅरिफ आहे, त्यामुळे निर्यातीला प्रचंड फटका बसला आहे. त्यासोबतच ज्या वस्तूंवर झिरो टॅरिफ आहे, त्या वस्तूंच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे.
भारतामधून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीला जीटीआरआयने तीन श्रेणींमध्ये विभागले आहे, पहिली श्रेणी आहे, ज्यावर झिरो टॅरिफ आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, औषधे, आणि पेट्रोलियम उत्पादनाचा समावेश आहे. ज्या वस्तूंवर झिरो टॅरिफ आहे, त्या वस्तूंचा एकूण निर्यातीमध्ये 40.3 टक्के वाटा आहे. मात्र या वस्तूंच्या निर्यातीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे, ही निर्यात तब्बल 25.8 टक्क्यांनी घटली आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे, भारताला मोठा फटका बसला आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे, त्यामुळे भारतावर हा टॅरिफ लावण्यात आला आहे.
