डोनाल्ड ट्रम्प यांची या देशावर सर्वात मोठी कारवाई, थेट मोठी घोषणा, आता युद्ध अटळ? जगभरात खळबळ
अमेरिकेनं आता पुन्हा एकदा आणखी एका देशावर मोठी कारवाई केली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे, जगात पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता आहे .

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि त्याच्या आसपास असलेले सर्व एअरस्पेस बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा तणाव सुरू आहे, त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरस्पेस बंद करण्याची घोषणा केली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात व्हेनेझुएलाला धमकी दिली होती, की लवकरच अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करेल, त्यानंतर आठवडा भरताच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून, आता व्हेनेझुएला काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर गंभीर आरोप केले आहेत, व्हेनेझुएलामधून ड्रग्सचं मोठं नेटवर्क चालवलं जातं, ज्याचा थेट मोठ्या प्रमाणावर फटका हा अमेरिकेला बसत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे व्हेनेझुएलाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी व्हेनेझुएला आणि त्याच्या आसपास असलेले सर्व एअरस्पेस बंद केले आहेत. एवढचं नाही तर त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना देखील पदावरून हटवण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना मान्यता देण्यात आलेली नाही, मादुरो हे अवैध नेते असल्याची भूमिका अमेरिकेची आहे, त्यामुळे देखील गेल्या अनेक वर्षांपासून व्हेनेझुएला आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरू आहे, दरम्यान अमेरिकेकडून युद्धाची धमकी आल्यानंतर व्हेनझुएलानं देखील प्रतिक्रिया देताना आम्ही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे भविष्यात आता हा संघर्ष युद्धाचं रूप घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका हा अमेरिकेतील व्यापाऱ्यांना बसला आहे. सध्या अमेरिकेमध्ये अनेक वस्तूंची कमतरता जाणवत असून, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
