मोठी बातमी! अमेरिकेत अभूतपूर्व गोंधळ, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, एक झटक्यात.., बायडन यांनाही तुरुंगात टाकण्याची तयारी
डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेमध्ये आले आहेत, ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. बायडन यांना देखील इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती जो बायडन यांच्याद्वारा ऑटोपेनच्या माध्यमातून घेतले गेलेले सर्व दस्तऐवज आणि निर्णय रद्द केले आहेत. याबाबत बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे, की जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये अनेक निर्णय आणि सरकारी आदेशावर ऑटोपेनच्या माध्यमातून सही करण्यात आली आहे. ऑटोपेन हे एक असं मशीन आहे, जाचा वापर करून सबंधित व्यक्तीच्या सहीची एक प्रत तयार करण्यात येते, आणि त्यानंतर या सहीचा वापर हा सरकारी कामकाजामध्ये करण्यात येतो. या माध्यमातून करण्यात आलेली सही ही त्या व्यक्तीची परवानगी आहे, असं मानलं जातं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आदेश काढत जो बायडन यांच्या कार्यकाळात अशा पद्धतीने घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोस्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मोठा दावा केला आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात ऑटोपेनच्या माध्यमातून जे निर्णय घेण्यात आले होते, ते निर्णय आता रद्द करण्यात आले आहेत, इथून पुढे या निर्णयाचं आणि सरकारी ऑर्डरचं कोणतंही अस्तित्व असणार नाहीये. जो बायडन यांनी आपल्या कार्यकाळात जवळपास 92 टक्के निर्णय हे ऑटोपेनच्या माध्यमातून घेतले होते, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी आता थेट बायडन यांना धमकी देखील दिली आहे, जर बायडन यांनी असा दावा केला की, कर्मचारी त्यांच्या आदेशानुसार काम करत होते, तर खोटी साक्ष दिली म्हणून बायडन यांच्यावर सुद्धा खटला दाखल करण्यात येईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
नेमका काय आहे ट्रम्प यांचा दावा?
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे, जो बायडन यांच्या कार्यकाळात जवळपास 92 टक्के निर्णय हे ऑटोपेनच्या माध्यमातून घेण्यात आले होते, या निर्णय प्रक्रियेत कुठेही बायडन सहभागी नव्हते. बायडन यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हे सर्व निर्णय अवैध पद्धतीने घेतले होते. बायडन यांची सत्ता जाण्यास सुद्ध हेच लोक कारणीभूत आहेत, त्यामुळे मी हे सर्व निर्णय रद्द करत आहे, आता या निर्णयाचं कोणतंही अस्तित्व असणार नाही. दरम्यान यावेळी त्यांनी बायडन यांना देखील धमकी दिली आहे, जर बायडन यांनी म्हटलं की ते अधिकारी त्यांच्या आदेशानुसार काम करत होते, तर अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर देखील खटला दाखल करण्यात येईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
