भारत-रशियात सर्वात मोठा करार, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका, अमेरिकाला सडेतोड उत्तर!
भारताने रशियासोबतचा आपला व्यापार कमी करावा यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांना धक्का देणारा मोठा निर्णय रशिया आणि भारताने घेतला आहे.

Rusia And India Military Agreement : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक देश व्यापार, लष्करी पातळीवर स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या देशांशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि भारत यांच्यातही वेगवेगळ्या करारावर चर्चा चालू आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत आहे. टॅरिफ हादेखील याच दबावाचा एक भाग आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून जाते. पण या सर्व दबावाला झुगारून भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री घट्ट करणारी मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा करार होण्याची दाट शक्यता आहे. या करारामुळे आता अमेरिका, चीन यांच्यासोबतच पाकिस्तानचेही टेन्शन वाढणार आहे.
नेमका करार काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामुळे आता भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्याआधीच भारताचा रशियासोबतच आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्यविषयक करार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही देशांत चर्चा चालू आहे.
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता करार
हा करार पूर्णत्त्वास जावा यासाटी रशियाची कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘स्टेट डुमा’मध्ये भारतासोबतच्या लष्करी कराराला मान्यता देण्यासाठी तयारी चालू आहे. पुतीन येत्या 4 ते 5 डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्याआधीच रशियात या घडामोडी घडत आहेत. या कराराला रेसिप्रोकल एक्स्चेंज ऑफ लॉजिसिट्क्स अॅग्रिमेंट (RELOS) असे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा करार प्रलंबित आहे. या वर्षाच्या 18 फेब्रुवारी रोजी भारताचे राजदूत वियम कुमार आणि रशियाचे तत्कालन उपसंरक्षणमंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमीन यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती.
दोन्ही देशांच्या लष्कराचा होणार फायदा
या करारामुळे भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री आणखी दृढ होणार आहे. या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या लष्कराला एकमेकांना सहकार्य करणे सोपे होणार आहे. तसेच संयुक्त लष्करी अभ्यास, संकटकाळात मानवी मदत, इंधन बरणे तसेच आरोग्यविषयक मदत करण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी तळ वापरणे सोपे होणार आहे.
भारताला काय फायदा होणार?
दरम्यान, या करारामुळे भारताला अनेक अर्थांनी फायदा होणार आहे. सर्वप्रथम भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी घट्ट होतील. या करारामुळे चीन, पाकिस्तान यांच्याशी स्पर्धा करणे सोपे होईल. दुसरीकडे या करारामुळे अमेरिकेवरही दबाव वाढेल. भारताचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तर दुसरीकडे रशियान नौदलाला भारतीय नौदलाचे तळ वापरता येतील. त्यामुळे रशियाचीदेखील हिंदी-प्रशांत क्षेत्रात उपस्थिती वाढेल. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
