अमेरिकेत खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर, नो किंग्ज..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावला. शिवाय व्हिसाच्या नियमात त्यांच्याकडून बदल केली जात आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली आहेत.

अमेरिकेत खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर, नो किंग्ज..
Donald Trump
| Updated on: Oct 19, 2025 | 7:43 AM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसतंय. ट्रम्प यांच्याविरोधात लोक थेट रस्त्यावर उतरले असून त्यांचा जोरदार विरोध केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेले निर्णय जगावर भारी पडताना दिसत आहेत. अनेकांचा नोकऱ्या धोक्यात आल्या. विशेष म्हणजे फक्त अमेरिकाच नव्हे तर इतरही देश डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करत आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध वॉशिंग्टन डीसी ते लंडनपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला त्यांनी नो किंग्ज असे नाव दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन, शिक्षण आणि सुरक्षा धोरणांचा लोक निषेध करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासोबतच विद्यार्थी व्हिसामध्येही मोठे बदल केली आहेत. यामुळे इतर कोणत्याही देशातील विद्यार्थ्याला अमेरिकेत शिक्षण घेणे आता अवघड झाले आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व्हिसा कमी देण्यात आले. याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेतील विद्यार्थी आणि विद्यापीठे विरोध करत आहेत. आयोजकांच्या मते, अमेरिकेसह जगभरात 2600 हून अधिक “नो किंग्ज” निदर्शने होत आहेत. आता लोक थेट भूमिका डोनाल्ड ट्रम्प  यांच्या विरोधात घेताना दिसत आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर लंडनमधील लोक अमेरिकन दूतवासाबाहेर जमले.

आयोजकांचे म्हणणे आहे की ही निदर्शने ट्रम्पच्या हुकूमशाही प्रवृत्तींविरुद्ध निषेध आहेत. ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून एखाद्या हुकूमशाहसारखे वागत आहेत. जगाला फक्त धमकावण्याचे काम करत आहेत. जर एखाद्या देशांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर थेट टॅरिफची धमकी दिली जात आहे. लंडनमधील ही रॅली अमेरिका आणि जगभरात आयोजित केलेल्या 2600 हून अधिक निदर्शनांपैकी एक आहे.

वॉशिंग्टन डीसीच्या मुख्य भागात निदर्शकांनी विविध कपडे परिधान केले होते आणि त्यांच्या हातात बॅनर होते. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 10 महिन्यांतच ट्रम्प यांनी त्यांचे इमिग्रेशन निर्बंध कडक केले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका बसला. यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये हे नियम अधिक कडक केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. लंडनमधील या मोर्चामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडालीये.