कुठे तयार होत आहे जगातले पहिले सोन्याचे शहर? गोल्डन स्ट्रीटवर चालण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार

Dubai Golden City: अरब देशाची ताकद तेल आणि सोने आहे. ज्यास आता वाढवले जात आहे. UAE ने एका नवा प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ज्यात केवळ दुकानेच नव्हे तर संपूर्ण शहरच सोन्याचे केले जाणार आहे.

कुठे तयार होत आहे जगातले पहिले सोन्याचे शहर? गोल्डन स्ट्रीटवर चालण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार
Dubai Golden City
| Updated on: Jan 29, 2026 | 10:04 PM

दुबई सरकारने एक शानदार आणि अनोखी योजना घोषीत केली आहे. दुबईत जगातील ‘पहिली गोल्ड स्ट्रीट’ म्हणजे सोन्याची दुकाने असलेला मार्ग बांधला जाणार आहे. हा प्रोजेक्ट दुबईसाठी एका नव्या ‘दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट’ चा भाग आहे. ज्याला ‘सोन्याचे घर’ वा ‘होम ऑफ गोल्ड’ म्हटले जाते. याचा हेतू दुबईला सोने आणि ज्वेलरीच्या व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र बनवणे हा आहे.

1 हजाराहून जास्त सोन्याची दुकाने

हा गोल्ड स्ट्रीट संपूर्णपणे सोन्याच्या एलिमेंट्सपासून तयार केला जाणार आहे. यास जगातला पहिला असा रस्ता म्हटला जात आहे. हा रस्ता दुबईच्या डेरा परिसरात तयार केला जात असून डेरा परिसर आधीच सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक सोने आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी येत असतात. या नव्या डीस्ट्रीक्टमध्ये रिटेल दुकाने, होलसेल ट्रेंडींग, बुलियन ( सोन्याच्या विटा ) , गुंतवणूक आणि ज्वेलरीशी संबंधित सर्वकाही एकाच जागी उपलब्ध होणार आहे. येथे किमान एक हजाराहून अधिक रिटेल सोन्याची दुकाने असणार आहेत. त्यामुळे पर्यटक आणि व्यापाऱ्यासाठी हे एक मोठे आकर्षण ठरणार आहे.

सोन्याच्या शहराने दुबईची शान वाढणार

हा प्रकल्प इथरा दुबईने लाँच केला आहे. जो दुबई डिपार्टमेट ऑफ इकॉनॉमी एण्ड टुरिझम(DET) आणि दुबई फेस्टीव्हल्स एण्ड रिटेल इस्टॅब्लिशमेंट (DFRE) अंतर्गत काम करतो. DFRE चे सीईओ अहमद अल खाजा यांनी सांगितले की सोने दुबईच्या संस्कृती आणि व्यापारात खोलवर रुजले आहे.हा आमचाा वारसा, समृद्धी आणि भावनेचे प्रतीक आहे. गोल्ड डीस्ट्रीक्ट आणि गोल्ड स्ट्रीट दुबईला सोन्याचे जागतिक केंद्र रुपात आणखी मजबूत करेल असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

दुबई सरकारने जारी केला व्हिडीओ

या रस्त्याची डिझाईन, अचूक लोकेशन आणि पूर्ण होण्याची कालमर्यादा याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जारी केली जाणार आहे. प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच दुबई सरकारने याचा पहिला व्हिडीओ रिलीज केला असून त्याने लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण केली आहे. दुबई नेहमीच लक्झरी आणि इनोव्हेशनसाठी ओळखली जाते. बुर्ज खलीफा, पाम आयलँड्स आणि आता गोल्ड स्ट्रीट दुबईची शान होणार आहे. नवा प्रकल्प केवळ व्यापाराला प्रोत्साहन देणार नाही तर पर्यटनला नव्या उंचीवर नेईल. जगभरातील लोक आता दुबईत सोन्याच्या रस्त्यावर चालण्यास कधी मिळणार आहे याची वाट पाहात आहेत.